खेळ अजून बाकी, नितीश कुमारांचा पक्ष संपणार; तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 06:21 PM2024-01-28T18:21:36+5:302024-01-28T18:23:19+5:30
आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएसोबत जात पुन्हा सरकार स्थापन केले आहे.
आज बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. नितीश कुमार यांनी राजद सोडून भाजपसोबत नवे सरकार स्थापन केले. त्यांनी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.त्यांच्यासोबत भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे, महाआघाडीतील पक्षांमध्ये त्यांच्या एनडीएमध्ये प्रवेश करण्यावरून मतभेद आहेत. आधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांना आया राम गया राम अशी उपाधी दिली, आता त्यांचे सरकारमध्ये भागीदार असलेल्या तेजस्वी यादव यांनीही नितीशबाबूंवर जोरदार टीका केली.
तेजस्वी यादव म्हणाले की, ते खूप थकलेले नेते होते, आम्ही त्यांना १७ महिन्यांत ऐतिहासिक काम करायला लावले. तेजस्वी यादव यांनी जेडीयूबाबतही मोठी भविष्यवाणी केली आहे. खेळ अजून सुरूच आहे, नितीश कुमारांचा पक्ष २०२४ मध्येच संपेल, असंही तेजस्वी यादव म्हणाले.
यापूर्वी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार यांनी मोठी पावले उचलली आणि महाआघाडीपासून दुरावले आणि पुन्हा एकदा एनडीएमध्ये सामील झाले. राजीनामा सुपूर्द केल्यानंतर नितीश कुमार यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली आणि संवाद साधला. नितीशकुमार यांनी आरजेडीविरोधात काहीही न बोलता काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला.
बिहारमध्ये पुन्हा NDA'चे सरकार! नितीश कुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, नवव्यांदा CM बनले
दुसरीकडे, नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर तेजस्वी यादव यांनी जोरदार टीका केली. यादव म्हणाले, खूप दमलेले नेते आहेत, त्यांच्याकडून कोणतेही काम होत नाही, आम्हीच १७ महिन्यांत ऐतिहासिक काम केले. त्यामुळे बिहारमध्ये एवढा विकास झाला आहे, जो पूर्वीच्या सरकारच्या काळात होऊ शकला नाही.
आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. नितीश कुमार वारंवार बाजू बदलत असल्याचा दावा केला. बघा, खेळ अजून चालू आहे, नितीश कुमारांचा पक्ष जेडीयू २०२४ मध्येच संपणार आहे. राजद पराभव स्वीकारणार नाही. खरा खेळ आता बिहारमध्ये सुरू होणार आहे, असंही यादव म्हणाले.