खेळ, उन...पावसाचा ढगाळ वातावरण : ४० तापमानानंतर दुपारी पाऊससरी
By Admin | Published: March 28, 2016 01:15 AM2016-03-28T01:15:13+5:302016-03-28T01:15:13+5:30
जळगाव : पुणे येथील वेधशाळेने राज्यातील बहुतांश भागात पावसाचे भाकित वर्तविल्यानंतर जळगाव शहरात रविवारी सकाळपासून उन आणि पावसाचा खेळ सुरु होता. दुपारी एक वाजेपर्यंत ४०.६ सेल्सीअस पर्यंत पोहचलेल्या तापमानानंतर दुपारी पावसाच्या सरी जळगावकरांनी अनुभवल्या. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण राहिले.
ज गाव : पुणे येथील वेधशाळेने राज्यातील बहुतांश भागात पावसाचे भाकित वर्तविल्यानंतर जळगाव शहरात रविवारी सकाळपासून उन आणि पावसाचा खेळ सुरु होता. दुपारी एक वाजेपर्यंत ४०.६ सेल्सीअस पर्यंत पोहचलेल्या तापमानानंतर दुपारी पावसाच्या सरी जळगावकरांनी अनुभवल्या. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण राहिले.पुणे येथील वेधशाळेने राज्यातील बहुतेक भागात पावसाची शक्यता वर्तविली होती. उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमान तर मराठवाडा व विदर्भात काही जागी सरासरी तापमान लक्षणीय वाढल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शनिवारी मध्यरात्री जळगाव जिल्ह्यात किरकोळ स्वरुपाचा पाऊस झाला होता. खोटे नगर, अजिंठा चौफुली परिसर, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरासह शिरसोली येथे मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास पाऊस झाला होता. रविवारी सकाळी ९ वाजेपासून उन्हाचा तडाखा जाणवत होता. दुपारी दीड वाजेपर्यंत कमाल तापमान ४०.६ तर किमान तापमान १९.६ पर्यंत होते. त्यानंतर वातावरणात काही प्रमाणात गारवा आला. दुपारी अडीच वाजेनंतर ढगाळ वातावरण झाले. जळगाव शहरात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. काही वेळ आलेल्या या पावसामुळे सर्वसामान्य नागरिक आणि विक्रेत्यांची तारांबळ उडाली. अवघे दोन ते तीन मिनीटे पाऊस झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ढगाळ वातावरण कायम होते.