गणपती, कार्तिकस्वामी मंदिरांत फेब्रुवारीत होणार मूर्ती प्राणप्रतिष्ठा

By Admin | Published: August 2, 2015 10:55 PM2015-08-02T22:55:11+5:302015-08-02T22:55:11+5:30

त्र्यंबकेश्वर : शहराचे प्रवेशद्वार आणि अंजनेरीकरांचे ग्रामदैवत समजल्या जाणार्‍या नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरी गावात नव्याने बांधण्यात आलेल्या गणपती व कार्तिकस्वामी मंदिरांत ९ व १० फेब्रुवारी रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आर. आर. पांडे, शिंदे यांनी दिली. येथील त्रिविक्रम जोशी, गोविंदराव मुळे, प्रशांत गायधनी, गिरीश जोशी, नितीन मोराडे यांनी चर्चा करून वरील लाभदायक मुहूर्त निश्चित केले. दोन्ही मंदिरांसाठी सुबक अशा मूर्ती तयार करून घेण्यात आल्या असून, शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

Ganapati, Karthik Swami Temple will be in February, Pranaprishtha | गणपती, कार्तिकस्वामी मंदिरांत फेब्रुवारीत होणार मूर्ती प्राणप्रतिष्ठा

गणपती, कार्तिकस्वामी मंदिरांत फेब्रुवारीत होणार मूर्ती प्राणप्रतिष्ठा

googlenewsNext
र्यंबकेश्वर : शहराचे प्रवेशद्वार आणि अंजनेरीकरांचे ग्रामदैवत समजल्या जाणार्‍या नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरी गावात नव्याने बांधण्यात आलेल्या गणपती व कार्तिकस्वामी मंदिरांत ९ व १० फेब्रुवारी रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आर. आर. पांडे, शिंदे यांनी दिली. येथील त्रिविक्रम जोशी, गोविंदराव मुळे, प्रशांत गायधनी, गिरीश जोशी, नितीन मोराडे यांनी चर्चा करून वरील लाभदायक मुहूर्त निश्चित केले. दोन्ही मंदिरांसाठी सुबक अशा मूर्ती तयार करून घेण्यात आल्या असून, शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
अंजनेरी गावाजवळ असणारी ही दोन्ही पुरातन मंदिरे रस्ता व चौपदरीकरणात अडथळा ठरत असल्याने प्रशासनाने हटविण्याचा निर्णय घेतला होता. अंजनेरी ग्रामस्थ व भाविकांनी ही मंदिरे हटविण्यास तीव्र विरोध दर्शविला होता. अखेर ग्रामपंचायतीने ही मंदिरे हटविण्याचा ठराव सार्वजनिक बांधकाम विभागाला देताना नवीन मंदिरे बांधून देण्याची अट घातली होती. त्यानुसार रस्त्याच्या कामाअगोदरच सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन जागेत श्री गणपती मंदिर व श्री कार्तिकस्वामी मंदिर नसल्याने बांधून दिले आहे.
गणेश मंदिरातील मूर्ती काढताना मूर्तीचे नुकसान झाल्याने सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व राजकीय कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनात त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता. प्रांताधिकारी बाळासाहेब वाघचौरे यांनी तहसील कार्यालयात अंजनेरी ग्रामस्थ, त्र्यंबकेश्वर पुरोहित यांची बैठक घेऊन समन्वय साधला होता. त्यानुसार आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अंजनेरी ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्र्यंबकमधील पुरोहितांच्या पौरोहित्याखाली शास्त्रशुद्ध पद्धतीने, विधिवत मंत्रोच्चारात मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा फेब्रुवारीत पार पडणार आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाशी झालेल्या करारानुसार दोन्ही मंदिरांसमोर सभामंडप बांधून देण्याचे कबूल करूनही अद्याप सभामंडप झालेले नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

.......(मुर्तींचे फोटो मिळाल्यास पाठवते)..........

Web Title: Ganapati, Karthik Swami Temple will be in February, Pranaprishtha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.