गांधी जयंती
By admin | Published: October 3, 2015 12:20 AM2015-10-03T00:20:24+5:302015-10-03T00:20:24+5:30
महात्मा फुले शिक्षण संस्था
Next
म ात्मा फुले शिक्षण संस्थानागपूर : महात्मा फुले शिक्षण संस्थतर्फे परिसर स्वच्छता हा कार्यक्रम राबवून महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार, सचिव सुरेंद्र आर्य, कार्याध्यक्ष शेषराव उमप, उपाध्यक्ष गुलाबराव चिचाटे, रविंद्र अंबाडकर, प्रा. मुकेश घोळसे, राजेंद्र पाटील, शरद चांदोरे, घनश्याम खवले, विनायक गवडी, राजू गाडगे, शंकर घोळसे, डॉ. रुपराव गहुकर, माधवराव घोळसे, आदी उपस्थित होते.इंदिरा गांधी हायस्कूलनागपूर : राष्ट्रीय स्नेही शिक्षण संस्थेद्वारे संचालित विविध शाळांच्यावतीने जुना सुभेदार ले-आउटच्या इंदिरा गांधी हायस्कूल येथे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव सुरेश धावडे उपस्थित होते. प्रास्ताविक जी.एस. चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पालवे यांनी तर आभार प्रदर्शन एस.पी. काळे यांनी केले.शकुंतला पब्लिक स्कूलनागपूर : शकुंतला मल्टिपरपज सोसायटीद्वारे संचालित शकुंतला पब्लिक स्कूल आणि बारक्लेज प्ले हाऊस यांच्यातर्फे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला शाळेचे संचालक सुनील आर. शेंडे, मुख्याध्यापिका वर्षा शेंडे, भिवगडे, कुंदर, वाघ व डी.सी. टेंभुर्णे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शैलजा व स्मिता यांनी केले. सीमा यांनी आभार मानले.रिपब्लिकन पक्ष(खोरिपा)नागपूर : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पक्ष(खोरिपा)च्या वतीने चितार ओळी चौक, सी.ए. रोड येथील गांधीजींच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. प्रदीप बोरकर, पांडुरंग बोरकर, ओमप्रकाश सोमकुवर, रामभाऊ मेश्राम, उज्ज्वला बोरकर, हेमराज चिचखेडे, अरुण मेश्राम, सुधीर पाटील, ॲड. जिजा सोमकुवर, आदी उपस्थित होते.विठ्ठलराव चामट हायस्कूलनागपूर : विठ्ठलराव चामट हायस्कूल व प्राथमिक शाळेच्यावतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रभातफेरी व कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका कल्पना मुंगले, विमल लेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. मोहन तेलरांधे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन वनमाला रामटेके यांनी केले. रमेश इखारकर यांनी आभार मानले.