Gandhi Jayanti : पाकसह 124 देशांच्या गायकांनी गायले बापूंचे भजन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 03:01 PM2018-10-02T15:01:47+5:302018-10-02T15:11:19+5:30
Gandhi Jayanti: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 150वी जयंती आहे. देशभरात गांधी जयंती साजरी करण्यात येत असून अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 150वी जयंती आहे. देशभरात गांधी जयंती साजरी करण्यात येत असून अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, भारत सरकारच्या प्रयत्नामुळे जगभरातील 124 देशांच्या टॉप गायकांनी बापूंना अनोखी आदरांजली वाहिली आहे.
बापूंच्या आवडत्या भजनांपैकी एक असलेले 'वैष्णव जन तो तेने कहिए..' हे भजन जगभरातील 124 देशांतील गायकांनी मिळून गायले आहे. मंगळवारी राष्ट्रपती भवनमध्ये आंतरराष्ट्रीय स्वच्छता कार्यक्रमादरम्यान पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी जगभरातील गायकांनी गायलेल्या भजनाचा व्हिडीओ लॉन्च केला.
The world joins in paying homage to Bapu through his favourite Bhajan 'Vaishnav Jan To'. PM @narendramodi & EAM @SushmaSwaraj release a medley version of bhajan from artists of 124 countries at function at Rashtrapati Bhawan. Press Release at https://t.co/yhWnzY0Sb8#BapuAt150pic.twitter.com/GwQpQajvJ9
— Raveesh Kumar (@MEAIndia) October 2, 2018
दरम्यान, या व्हिडीओमध्ये सर्व देशांच्या गायकांनी आपापल्या देशाच्या बॅकग्राऊंडसोबत भजन गायले आहे. या देशांमध्ये पाकिस्तानमधील गायक शफकत अमानत अली यांचा सुद्धा समावेश आहे.