गांधी-शास्त्री जयंती

By admin | Published: October 3, 2015 12:20 AM2015-10-03T00:20:29+5:302015-10-03T00:20:29+5:30

अथर्व बहुउद्देशीय संस्था

Gandhi-Shastri Jayanti | गांधी-शास्त्री जयंती

गांधी-शास्त्री जयंती

Next
र्व बहुउद्देशीय संस्था
नागपूर : रामबाग कॉलनी येथील अथर्व बहुउद्देशीय ग्रामीण विकास संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने महात्मा गांधी यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनीष पिल्लेवार, उपाध्यक्ष सुमेध आवळे, सचिव विवेक वैरागडे, कोषाध्यक्ष जितेंद्र चव्हाण व इतर सभासद उपस्थित होते. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
भाजपा दक्षिण पश्चिम मंडळ
नागपूर : भारतीय जनता पार्टी, दक्षिण-पश्चिम मंडळ, खामला व प्रतापनगरद्वारे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. अनिल सोले, कर समिती सभापती गिरीश देशमुख, शिक्षण सभापती गोपाल बोहरे, पल्लवी शामकुळे, नीलिमा बावणे, लक्ष्मीनगर झोनच्या सभापती जयश्री वाडीभस्मे, पांडे, डॉ. राम केळापुरे, पीयूष पाटील, मनोज परसवाणी, अनघा भांडारकर, वर्षा चौधरी, प्रदीप चौधरी व इतर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
दक्षिण पश्चिम युवक काँग्रेस कमिटी
नागपूर : दक्षिण पश्चिम युवक काँग्रेस कमिटीतर्फे महासचिव विशाल वाघमारेंच्या नेतृत्वात महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. वॉर्ड अध्यक्ष दुर्गेश मसराम यांनी माल्यार्पण करुन अभिवादन केले. यावेळी संकेत कांबळे, मंगेश कामोने, वृषभ सुते, विकास कोवे, प्रतीक मसराम, नवनीत चौधरी, राजेश देवाये, शंकर नेवारे, अमोल सोनारे, अजय गणवीर, मनोहर मोहुर्ले, गौतम भांगे, पप्पू वाळके, दीपक मोहुर्ले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जवाहर विद्यार्थी गृह
नागपूर : सिव्हील लाईन्स येथील जवाहर विद्यार्थी गृह संस्थेतर्फे धोटे सभागृहात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष रमेश गिरडे यांनी माल्यार्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त शंकरराव भुते, गुलाबराव जुननकर, चंद्रकांत ढोबळे, मिलिंद माकडे, शेषराव सावरकर, डी. आर. सातपुते, प्रशांत पाहूणे, प्रमोद महाजन, बबिता मेहर आदी उपस्थित होते.
नागपूर शहर काँग्रेस कमिटी
नागपूर : नागपूर शहर(जिल्हा) काँग्रेस कमिटी, अल्पसंख्यांक सेलच्यावतीने महात्मा गांधी जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी शहर अध्यक्ष ओवेस कादरी, प्रदेश सचिव सय्यद मुमताज, जावेद पठाण, इमरान अन्सारी, इफ्तेखार अन्सारी, साकीर अब्बास अली, जामीद खान, सय्यद अकबद अली, फिरोज खां, अहेफाज अन्सारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Gandhi-Shastri Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.