बाबरी मशीद प्रकरणानंतर अयोध्येचा दौरा करणारे राहुल पहिलेच गांधी
By admin | Published: September 9, 2016 11:45 AM2016-09-09T11:45:56+5:302016-09-09T12:25:38+5:30
बाबरी मशीद प्रकरणानंतर अयोध्येचा दौरा करणारे राहुल गांधी हे नेहरू-गांधी कुटुंबातील पहिले सदस्य आहेत.
Next
- ऑनलाइन लोकमत
अयोध्या, दि. 9 - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी अयोध्येच्या दौरा करत 26 वर्षापुर्वीचा रेकॉर्ड तोडला आहे. बाबरी मशीद प्रकरणानंतर अयोध्येचा दौरा करणारे राहुल गांधी हे नेहरू-गांधी कुटुंबातील पहिले सदस्य आहेत. राहुल गांधी यांनी सकाळी हनुमान गढी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर महंत ज्ञानदास यांची भेट ते घेणार आहेत. विश्व हिंदू परिषदेविरोधात भुमिका मांडल्याने महंत ज्ञानदास चर्चेत आले होते.
किसान यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेशमध्ये असून देवरिया ते दिल्ली असा सुमारे २५०० किलोमीटरचा प्रवास राहुल गांधी या यात्रेमध्ये करणार आहेत. त्यामध्ये ते विविध ठिकाणी खाट सभा घेणार असून, वेगवेगळ्या लोकांनाही भेटणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीकडे लक्ष ठेवूनच राहुल गांधींच्या दौ-याचे आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
राहुल गांधी यांच्या अयोध्या दौ-याला राजकीय महत्व प्राप्त झालं आहे. 26 वर्षांपुर्वी राहुल गांधी यांचे वडिल आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी 1990मध्ये सद्भावना यात्रेसाठी अयोध्येत आले होते. त्यावेळी वेळ नसल्याने हनुमान गढी मंदिरात ते जाऊ शकले नव्हते.
Rahul Gandhi visits Hanumangarhi temple;becomes 1st in Nehru-Gandhi family to visit Ayodhya since'92 Babri demolit'n pic.twitter.com/2dnfBnxVTB
— ANI UP (@ANINewsUP) September 9, 2016