दोन हजाराच्या नव्या नोटेवरुन गांधीजीच गायब
By admin | Published: January 5, 2017 07:51 AM2017-01-05T07:51:31+5:302017-01-05T10:30:22+5:30
मध्यप्रदेशमधील शेओपूर जिल्ह्यातील एका गावात शेतकरी आश्चर्यचकित झाले जेव्हा त्यांना 2000 रुपयांच्या नव्या नोटेवर गांधीजींचा फोटोच दिसला नाही
Next
ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 5 - नोट खरी आहे की बनावट यासाठी सर्वात आधी त्यावर महात्मा गांधींचा फोटो आहे की नाही पाहिलं जातं. मात्र मध्यप्रदेशमधील शेओपूर जिल्ह्यातील एका गावात शेतकरी आश्चर्यचकित झाले, जेव्हा त्यांना 2000 रुपयांच्या नव्या नोटेवर गांधीजींचा फोटोच दिसला नाही. ही नोट बनावट असल्याची शंका शेतक-यांना आली. पण जेव्हा ही नोट घेऊन ते बँकेत पोहोचले तेव्हा मात्र त्यांना अधिका-यांनी जे सांगितलं ते ऐकून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.
शेतक-यांनी या नोटा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रांचमधून घेतल्या होत्या. जेव्हा गांधीजींचा फोटो नसलेल्या या नोटा घेऊन ते बँकेत पोहोचले तेव्हा प्रिंटिंगमध्ये झालेल्या चुकीमुळे गांधींजींचा फोटो छापला गेला नसल्याचं अधिका-यांकडून सांगण्यात आलं. अशा प्रकारच्या अनेक नोटा बाजारात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
Sheopur (Madhya Pradesh): Farmer receives Rs 2000 notes from SBI Bank without Mahatma Gandhi's image pic.twitter.com/To8yiFIFxq
— ANI (@ANI_news) 5 January 2017
नव्या नोटांच्या छपाईमध्ये त्रुटी असल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही नोटाबंदी निर्णयानंतर 500 आणि 2000 च्या नोटांच्या छपाईत त्रुटी असल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. मुख्यत: 2000 च्या नोटांमध्ये अनेक त्रुटी असल्याचं समोर आलं आहे.