गांधीजी ब्रिटीशांचे एजंट होते - मार्कंडेय काटजू

By Admin | Published: March 10, 2015 10:37 AM2015-03-10T10:37:25+5:302015-03-10T12:01:53+5:30

महात्मा गांधी हे ब्रिटीशांचे एजंट होते अशी टीका सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजूंनी राष्ट्रपिता महात्मा गांधीना लक्ष्य केले आहे.

Gandhiji was an agent of British - Markandey Katju | गांधीजी ब्रिटीशांचे एजंट होते - मार्कंडेय काटजू

गांधीजी ब्रिटीशांचे एजंट होते - मार्कंडेय काटजू

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १० - वादग्रस्त वक्तव्ये व टिपण्ण्यांमुळे सतत चर्चेत असणारे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व प्रेस काऊन्सिलचे अध्यक्ष मार्कंडेय काटजूंनी यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधीना लक्ष्य केले आहे. महात्मा गांधी हे ब्रिटीशांचे एजंट होते, असे त्यांनी म्हटले आहे. काटजूंनी त्यांच्या ब्लॉगद्वारे गांधीजींवर टीका करत 'गांधींनी देशाचे खूप मोठे नुकसान केले' असा आरोपही केला आहे. 
'फोडा आणि राज्य करा हे ब्रिटीशांचे धोरण होते. राजकारण सतत धर्माला घूसवून गांधीजींनी ब्रिटीशांचे तेच धोरण सुरू ठेवले', असे काटजूंनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे. गांधीजींची भाषणे अथवा वर्तमानपत्रातील त्यांचे लेख पाहिले असता हेच लक्षात येते की त्यांचा हिंदूंकडे जास्त ओढा होता. बापूंच्या प्रत्येक भाषणांत रामराज्यस ब्रह्मचर्य, गोमाता रक्षण यांसारख्या हिंदुत्ववादी विचारांचे उल्लेख असायचे', असेही लेखात म्हटले आहे. गांधीजींच्या अनेक सभांमध्ये 'रघुपति राघव राजा राम'चे बोल कानी पडत असत, असेही लेखात नमूद करण्यात आले आहे. 
या लेखात काटजूंनी महात्मा गांधींच्या सत्याग्रह आंदोलनालाही लक्ष्य करत त्यावर टीका केली आहे. गांधींजीनी क्रांतिकारी आंदोलनाला सत्याग्रही आंदोलनाकडे नेत ब्रिटीशांना फायदा करून दिला असा आरोपही लेखात करण्यात आला आहे. 

Web Title: Gandhiji was an agent of British - Markandey Katju

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.