'या' जागेवरुनही गांधीजी होणार गायब
By admin | Published: January 17, 2017 11:09 AM2017-01-17T11:09:05+5:302017-01-17T13:38:40+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाला सुरवात केल्यानंतर भाजपाने अनेक पोस्टर, बॅनर शहरभर लावले होते.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानाला सुरवात केल्यानंतर भाजपाने अनेक पोस्टर, बॅनर शहरभर लावले होते. त्यावर महात्मा गांधी यांचा फोटो, चष्मा आणि त्यांचे स्केच होते. हे बॅनर अस्वच्छ ठिकाणी लावू नका. गांधीजीचा अवमान अवमान होईल अशी कोणतीही कृती करु नका, असे आदेश केंद्र सरकारने तातडीने जारी केले आहेत.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महात्मा गांधी यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. लावण्यात आलेले हे पोस्टर सार्वजनिक शौचालये आणि इतर अस्वच्छ ठिकाणी असल्याने गांधीजींचा अवमान होऊ शकतो. असे म्हणत छत्तीसगड मधील बुद्रुद्दीन कुरेशी यांनी उच्चन्यायालयात अवनमान याचिका दाखल केली होती. कुरेशी य़ांच्य़ा याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली. मात्र, याचिका फेटाळून लावताना कोणत्या ठिकाणी गांधीजींचा फोटो लावल्यास अवमान होऊ शकतो हे निश्चित करण्याचे केंद्र सरकारला आदेश दिले होते.
त्यानुसार केंद्र सरकारच्या पाणी पुरवठा आणि आरोग्य मंत्रालयाने स्वच्छ भारत अभियानाच्या प्रमुखांना काही बंधनं घालून दिली आहेत. महात्मा गांधी यांच्याशी संबंधित कोणत्याही वस्तूचा सार्वजनिक शौचालये, कचरापेटी किंवा कोणत्याही अस्वच्छ ठिकाणी त्यांचे बॅनर असल्यास ते तात्काळ काढून टाकावेत असे आदेश देण्यात आले आहेत.