गांधीजींचा संघर्ष प्रेरणादायी
By admin | Published: October 3, 2016 06:31 AM2016-10-03T06:31:40+5:302016-10-03T06:31:40+5:30
गांधीजींनी हे जग एक चांगले स्थळ बनवले. त्यांचे आदर्श, गरिबांबद्दलचे समर्पण आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी केलेला संघर्ष हा प्रेरणादायी आहे
नवी दिल्ली- गांधीजींनी हे जग एक चांगले स्थळ बनवले. त्यांचे आदर्श, गरिबांबद्दलचे समर्पण आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी केलेला संघर्ष हा प्रेरणादायी आहे, असे मोदी यांनी टि्वटरवर म्हटले.
भारत २०१९ पर्यंत स्वच्छ करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करणे, चांगले काम करणाऱ्यांना गौरविणे आणि नव्याने निर्धार करणे ही रविवारी साजऱ्या झालेल्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेची वैशिष्ट्ये होती.
२ आॅक्टोबर २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचा प्रारंभ केला होता. त्याच्या दुसऱ्या वर्धापन दिनी महात्मा गांधींचे जन्मगाव पोरबंदरसह गुजरातमधील १७० गावे उघड्यावर शौचास जाण्यापासून मुक्त झाली आहेत, असे जाहीर करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानात गुजरातनंतर आंध्र प्रदेशने आपल्या सगळ््या नगरपालिका या उघड्यावर शौचास जाण्यापासून मुक्त केले.
>महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना रविवारी संपूर्ण देशभर अनुक्रमे १४७ व ११२व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आदी नेत्यांनी येथे राजघाटावरील गांधींच्या व विजयघाटावर शास्त्रींच्या स्मारकावर जाऊन फुले अर्पण केली.