भाजप आमदारासह ७ जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 06:35 AM2020-02-21T06:35:20+5:302020-02-21T06:35:48+5:30
उत्तर प्रदेशमधील घटना : आरोपींमध्ये आमदारांचे ५ पुत्र, भाचा
वाराणसी : उत्तर प्रदेशमधील भदोही विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी, त्यांचे पाच पुत्र व भाचा, अशा सात जणांवर सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदविला आहे. यासंदर्भात बलात्कारपीडित महिलेने पोलिसांकडे ९ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. या महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, त्रिपाठी यांचा भाचा गेल्या सहा वर्षांपासून माझ्यावर बलात्कार करीत आहे. त्याशिवाय आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी व इतरांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान माझ्यावर बलात्कार केल्याचा या महिलेचा दावा आहे. या बलात्कारपीडितेस पोलिसांची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. पोलिसांच्या तपास पथकाने प्राथमिक पुरावे गोळा केल्यानंतर आमदार त्रिपाठी, त्यांचे पाच पुत्र सचिन, चंद्रभूषण, दीपक, प्रकाश, नितेश व भाचा संदीप या सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला.
या महिलेने म्हटले आहे की, तिच्या पतीचे २००७ साली निधन झाले असून, तिला मूलबाळ नाही. ती २०१४ साली मुंबईहून गावी परत येत असताना तिला संदीप ट्रेनमध्ये भेटला. त्यानंतर त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. संदीपने तिला लग्नाचे वचन देऊ न वाराणसी रेल्वेस्थानकाच्या जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये ८ आॅगस्ट २०१६ रोजी बलात्कार केला. त्यानंतर भदोही, वाराणसी, मुंबईतील हॉटेलांमधील वास्तव्यात संदीपने या महिलेवर वारंवार बलात्कार केला.
आमदार पुत्राकडून मारहाण
वाराणसी : महसूल खात्यातील दलित अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील रोहनिया विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांचा पुत्र हजारी सिंह व त्यांच्या दहा समर्थकांविरुद्ध पोलिसांनी बुधवारी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या अधिकाºयाचे नाव राधेश्याम राम, असे आहे.
चिन्मयानंदांच्या जामिनाला आव्हान
च्बलात्कार प्रकरणातील आरोपी व भाजपचे माजी आमदार स्वामी चिन्मयानंद यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३ फेब्रुवारी रोजी जामीन मंजूर केला होता. त्या निर्णयाला आव्हान देणाºया याचिकेवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. ही याचिका बलात्कारपीडित महिलेने दाखल केली असून, तिची बाजू ज्येष्ठ वकील कॉलिन घोन्साल्विस यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली. ही महिला स्वामी चिन्मयानंद यांच्या ट्रस्टकडून शहाजहानपूर येथे चालविण्यात येणाºया विधि महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.