मेट्रो स्टेशनवरून 24 वर्षीय तरूणीचं अपहरण करून धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 03:58 PM2017-09-23T15:58:56+5:302017-09-23T16:03:06+5:30
नोएडामध्ये एका 24 वर्षीय तरूणीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नोएडा, दि.23- नोएडामध्ये एका 24 वर्षीय तरूणीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या महिलेला मेट्रो स्टेशनजवळून कारमध्ये खेचण्यात आलं होतं. शुक्रवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे. पीडित महिलेचं नोएडाच्या गोल्फ कोर्स मेट्रो स्टेशनवरून अपहरण करण्यात आलं होतं. नंतर तीला दिल्लीच्या अक्षरधाम भागात टाकून देण्यात आलं. पीडित महिला नोएडाच्या सेक्टर 36 मधील रहिवासी आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास ती रीक्षेची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी स्कॉर्पिओ गाडीतून दोन जण आले आणि त्यांनी पीडित मुलीला सेक्टर 18 चा रस्ता विचारला. मुलगी त्यांना रस्ता सांगत असताना त्यांनी तिला गाडीच्या आत खेचलं आणि तेथून पळाले.
Noida: Woman allegedly gang-raped in a moving vehicle in Noida Sector 39, case registered & woman sent for medical examination.
— ANI UP (@ANINewsUP) September 23, 2017
पीडित मुलीला कारमधून नोएडा आणि दिल्लीतील विविध ठिकाणी फिरवत तिच्यावर सामूहित बलात्कार करण्यात आला. पीडित मुलीवर बलात्कार करून तिला मध्यरात्री दोन वाजता दिल्लीतील अक्षरधाम मंदिराच्या परिसरात टाकून आरोपी तेथून पळून गेले. नंतर त्या मुलीने 100 क्रमांकावर फोन करून पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. मुलीच्या फोननंतर दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिला नोएडा सेक्टर 39 च्या पोलीस स्थानकात आणलं.
पीडित मुलीच्या तक्रारीनुसार आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि धमकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती नोएडा सेक्टर 39 चे पोलीस अधिकारी अवनिश दिक्षीत यांनी दिली आहे. पीडित मुलीने वैद्यकिय तपासणीसाठी नकार दिला तसंच तपासासाठी तिचा मोबाइल फोनही द्यायला नकार दिला आहे, अशी माहितीही दिक्षीत यांनी दिली आहे. पीडित मुलीला आता वैद्यकिय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचं समजतं आहे.
दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू असून लवकर आरोपींना अटक होईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.