घरफोडी करणारी महिलांची टोळी जेरबंद गुन्हा उघडकीस : सीसीटीव्ही कॅमेर्यामुळे अडकल्या जाळ्यात
By Admin | Published: February 14, 2016 12:41 AM2016-02-14T00:41:37+5:302016-02-14T00:41:37+5:30
फोटो
फ टोजळगाव: कचरा वेचण्याच्या नावाखाली दिवसा घरफोडी करणार्या टोळीचा शनिवारी रामानंद नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रचना अनिल खलसे (वय २२), लता सदाशिव खंडारे (वय ४४), रंजना सुरेश रनसिंग (वय ३५),कल्पना धनराज हातांगळे (वय २१) व जमनाबाई गोरख कांबळे (वय ४५) (सर्व रा.राजीव गांधी नगर,जळगाव)या पाच महिलांना जेरबंद करण्यात आले आहे. दरम्यान, चोरीचे दागिने घेणारे महेशकुमार रमेशचंद्र वर्मा यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सीसीटीव्ही फुटेजमुळे अवघ्या दोन दिवसात गुन्हा उघडकीस आला आहे.या पाचही महिलांनी पाच फेब्रुवारी रोजी सतीश पंडितराव दामोदरे (वय ४६ रा. नुतन वर्षा कॉलनी) यांच्या लोंखडी दरवाजाचे कुलूप तोडून एक लाख ५५ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या,चांदीचे दागिने भरदिवसा लांबविले होते. दामोदरे हे पत्नीसह उत्तरकार्याच्या कार्यक्रमासाठी असल्याने ते ब्रुक बॉँड कॉलनीत गेले होते. त्यांच्या शेजारी राहणार्या मंजू सतीश मंगल यांनी दुपारी दोन वाजता दामोदरे यांना फोन करून जीन्याच्या लोखंडी प्रवेशद्वाराचे कुलूप तुटलेले असून दरवाजा अर्धवट उघडे असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर दोघांनी तातडीने घर गाठले असता बेडरुमधील दोन्ही लोखंडी कपाट उघडे होते तर त्यातील लॉकरमधील दागिने गायब झाल्याचे दिसून आले. रिक्षा चालकाची झाली मदतगुन्हा दाखल झाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी स्वत: घराची पाहणी केली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांना तपासाबाबत काही सूचना केल्या होत्या. या तपासासाठी वाडीले यांनी उपनिरीक्षक सुजाता राजपूत, शामराव पवार, महेंद्रसिंग पाटील, प्रदीप चौधरी, शरद पाटील, विजय खैरे, सुरेश मेढे, तृप्ती नन्नवरे, निलोफर सैयद व सुवर्णा तायडे आदींचे पथक कार्यान्वित केले. हे पथक वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी करत असताना घटनास्थळावरील दोन ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन महिला संशयास्पद जाताना व येताना दिसून आल्या. ते फुटेज घेऊन चौकशीचे सूत्रे फिरवली असता देशमुख नावाच्या तरुणाच्या रिक्षातून ते अजिंठा चौकात गेल्याचे निष्पन्न झाले. त्याने दिलेले व अन्य ठिकाणावरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांचा राहण्याचा ठिकाणा पोलिसांनी शोधला.