दोन रुपयांचं नाणं रुळांमध्ये टाकत ट्रेन रोखून लुटपाट करणा-या टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 12:44 PM2017-11-15T12:44:48+5:302017-11-15T12:52:42+5:30

दिल्ली - हावडा रेल्वे मार्गावर लुटपाट करणा-या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सोमवारी रात्री उशिरा सुरजपूर कोतवाली पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत टोळीतील दोघा दरेडोखोरांना अटक केली आहे

gang used 2 rupee coins to stop and rob trains arrested | दोन रुपयांचं नाणं रुळांमध्ये टाकत ट्रेन रोखून लुटपाट करणा-या टोळीचा पर्दाफाश

दोन रुपयांचं नाणं रुळांमध्ये टाकत ट्रेन रोखून लुटपाट करणा-या टोळीचा पर्दाफाश

Next
ठळक मुद्देदिल्ली - हावडा रेल्वे मार्गावर लुटपाट करणा-या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाशरोडेखोर डब्यांमध्ये चढत आणि हत्यारांचा धाक दाखवत प्रवाशांची लूट करत असेजवळपास गेल्या सहा महिन्यांपासून दिल्ली - हावडा रेल्वे मार्गावर ट्रेनमध्ये लुटीच्या घटना होत असल्याच्या तक्रारी येत होत्या

नोएडा : दिल्ली - हावडा रेल्वे मार्गावर लुटपाट करणा-या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सोमवारी रात्री उशिरा सुरजपूर कोतवाली पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत टोळीतील दोघा दरेडोखोरांना अटक केली आहे.  ही टोळी रेल्वे रुळांच्या मधोमध नाणं टाकून हिरवा सिग्नल लाल करत असत, ज्यामुळे रेल्वे चालक ट्रेन थांबवत असे. याचाच फायदा घेत हे दरोडेखोर डब्यांमध्ये चढत आणि हत्यारांचा धाक दाखवत प्रवाशांची लूट करत असे. जर या टोळीला पकडलं नसतं तर कदाचित भविष्यात खूप मोठी रेल्वे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, जवळपास गेल्या सहा महिन्यांपासून दिल्ली - हावडा रेल्वे मार्गावर ट्रेनमध्ये लुटीच्या घटना होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. दादरीपासून ते अलीगडपर्यंच लुटण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने एका चोराची ओळख पटवण्यात पोलिसांना यश मिळालं. सोमवारी रात्री पोलिसांना एक दरोडेखोर तिलपता डेपोजवळ असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचत दोघा दरोडेखोरांना अटक केली. राजन आणि दिनेश अशी या आरोपींची नावे आहेत. अन्य दोन आरोपी सुमित आणि रॉबिन अद्याप फरार आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक आरोपी सिग्नलपासून काही अंतरावर दोन रुपयाचं नाणं रेल्वे रुळाच्या मधोमध टाकत असे. यामुळे ग्रीन सिग्नल रेड होत असे. सिग्नल पाहिल्यानंतर रेल्वे चालक ट्रेन थांबवत असेल. याच संधीचा फायदा घेत टोळीतील इतर सदस्य ट्रेन थांबल्यानंतर डब्यांमध्ये चढत असत. डब्यात चढल्यानंतर प्रवाशांना शस्त्रांचा धाक दाखवत लुटलं जात असे. 

सिग्नल हिरवा होण्यासाठी तीन ते पाच मिनिटांचा वेळ लागत असे. इतक्या वेळात दरोडेखोर प्रवाशांना लुटून आरामशीरपणे पळून जात असत. आरोपींकडून दादरी ते बोडाकीदरम्यान चार ट्रेनमध्ये लूट केल्याचा खुलासा झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने टोळीच्या मुसक्या आवळणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. अखेर पोलिसांना यात यश मिळालं आहे. दरम्यान ट्रेनच्या रुळांमध्ये नाणं टाकल्याने एखादा अपघात झाला आहे का याचाही तपास सध्या सुरु आहे. 

Web Title: gang used 2 rupee coins to stop and rob trains arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.