उत्तर प्रदेश सरकारने बिजनौर ते बलियापर्यंत एक हजार गावांत गंगा आरती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 05:50 AM2021-01-31T05:50:10+5:302021-01-31T05:50:52+5:30
Uttar Pradesh News : उत्तर प्रदेश सरकारने बिजनौर ते बलियापर्यंत एक हजारांपेक्षा अधिक गावांत जीवनदायिनी गंगा नदीची आरती दररोज करण्याची योजना तयार केली आहे.
लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने बिजनौर ते बलियापर्यंत एक हजारांपेक्षा अधिक गावांत जीवनदायिनी गंगा नदीची आरती दररोज करण्याची योजना तयार केली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बिजनौर ते बलियापर्यंत गंगा नदीवरील दोन्ही किनारी वसलेल्या १,०३८ गावांना नवीन आरती स्थळ म्हणून निवडण्यात आले आहे. धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.या योजनेंतर्गत बिजनौर ते बलियापर्यंत गंगा नदीच्या पाच किलोमीटरच्या परिसरात दोन्ही किनाऱ्यांवरील गावांमध्ये आरती स्थळ निर्माण करण्याची प्रक्रिया पर्यटन विभागाच्या सहकाऱ्याने सुरू करण्यात येणार आहे. नवीन आरती स्थळांवर दररोज निश्चित वेळेवर गंगा आरतीचे आयोजन केले जाणार आहे. गंगा आरतीला गावे व विभागांशी जोडून उत्तर प्रदेश सरकार गंगा स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूप देण्याचा सरकारचा विचार आहे. या मोहिमेंतर्गत युवा पिढीमध्ये आपल्या संस्कृतीबद्दलचा संबंध अधिक दृढ करणार आहे व जीवनदायिनी गंगा नदीशी नाते आणखी मजबूत करण्याचा विचार रूजवला जाणार आहे. गंगा नदीच्या स्वच्छता मोहिमेसाठी नदीच्या किनाऱ्यावरील १४ जिल्ह्यांत विशेष संयंत्र सुरू करण्यात येणार आहेत.