गंगा किनारी कचरा गोळा करणा-यांना सापडले 9 लाख

By admin | Published: January 6, 2017 04:41 PM2017-01-06T16:41:48+5:302017-01-06T16:41:48+5:30

ऋषीकेश येथे गंगा नदीच्या किना-याजवळ शुक्रवारी कचरा उचलणा-यांना रद्द झालेल्या चलनातील 9.80 लाख रुपये सापडले.

Ganga beach collectors found 9 lakhs | गंगा किनारी कचरा गोळा करणा-यांना सापडले 9 लाख

गंगा किनारी कचरा गोळा करणा-यांना सापडले 9 लाख

Next

ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. 6 - ऋषीकेश येथे गंगा नदीच्या किना-याजवळ शुक्रवारी कचरा उचलणा-यांना रद्द झालेल्या चलनातील  9.80 लाख रुपये सापडले. उत्तम थारु गंगा नदीच्या किना-यावर कचरा गोळा करत असताना झुडूपामध्ये 500 रुपयांच्या विखुरलेल्या नोटांवर त्याचे लक्ष गेले. 
 
उत्तमने त्या सर्व नोटा गोळा करुन एका पिशवित भरल्या व ती पिशवी पोलिसांकडे सुपूर्द केली अशी माहिती पोलिसांनी दिली.  सापडलेल्या जुन्या नोटांचे एकूण मुल्य 9.80 लाख रुपये आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Ganga beach collectors found 9 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.