प्रदूषणामुळे गंगा नदी जगात सर्वात संकटग्रस्त; रसायनयुक्तपाणी प्रक्रियेशिवाय थेट सोडले जाते पात्रात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 02:43 AM2018-09-04T02:43:46+5:302018-09-04T02:44:07+5:30
गेल्या निवडणुकीत भाजपाने गंगा नदीच्या स्वच्छतेचे आश्वासन दिले. आता २0१९च्या निवडणुकांना काही महिने शिल्लक असताना गंगा स्वच्छ झालेली नाही.
नवी दिल्ली : गेल्या निवडणुकीत भाजपाने गंगा नदीच्या स्वच्छतेचे आश्वासन दिले. आता २0१९च्या निवडणुकांना काही महिने शिल्लक असताना गंगा स्वच्छ झालेली नाही. वर्ल्डवाइड फंडच्या अहवालानुसार, गंगा ही जगातील सर्वात संकटग्रस्त नद्यांपैकी एक आहे.
देशात २,0७१ किलोमीटर वाहणाऱ्या गंगेच्या पाण्यावर १0 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रावर शेती फुलते. मात्र, ऋषिकेशपासूनच गंगा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. ती जिथून वाहते, तेथील बहुतांश लोक नदीकाठीच शौचास जातात. कानपूरपासून ४00 किमी. अंतरावर गंगा नदी सर्वाधिक प्रदूषित आहे. गंगेच्या किनारी अनेक वीज प्रकल्प आहेत. त्यांचे रसायनयुक्त पाणी गंगेत सोडल्यामुळे प्रदूषणात भर पडते. अनेक कारखान्यांचे प्रदूषित पाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय थेट गंगेतच सोडले जाते. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमधून वाहणाºया गंगेची स्थिती या सर्व राज्यांत वाईटच आहे.
पाण्यासाठी तिसरे महायुद्ध?
यापुढे पाण्यासाठी देशात दंगली होतील, असा इशारा पाणीप्रश्नावर काम करणाºया तज्ज्ञांनी या आधीच दिला आहे, पण आता तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होण्याची भीती व्यक्त होत आहे.