गंगा नदीच्या किनारी आंघोळ किंवा फोटो काढायला गेल्यास होणार अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2016 04:42 PM2016-07-02T16:42:50+5:302016-07-02T16:42:50+5:30

गंगा बॅरेजवरुन प्रवास करत जर तुम्ही नदीच्या किनारी पोहोचलात तर शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली अटक होऊ शकते

Ganga will be able to take bath or photo on the banks of river banks | गंगा नदीच्या किनारी आंघोळ किंवा फोटो काढायला गेल्यास होणार अटक

गंगा नदीच्या किनारी आंघोळ किंवा फोटो काढायला गेल्यास होणार अटक

Next
>ऑनलाइन लोकमत - 
कानपूर, दि. 02 - गंगा नदीच्या किनारी पिकनिकला जाण्याची तयारी करत असाल तर सावधान व्हा, कारण तुम्हाला अटक होण्याची शक्यता आहे. गंगा बॅरेजवरुन प्रवास करत जर तुम्ही नदीच्या किनारी पोहोचलात तर शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली तुम्हाला अटक होऊ शकते. गेल्याच आठवड्यात सेल्फी घेण्याच्या नादात 7 तरुणांचा गंगा नदीत बुडून दुर्देवी मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 
 
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2015 पासून आतापर्यंत 24 लोकांचा गंगा नदीच्या किनारी बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. सिंचन विभागाच्या मदतीने गंगा बॅरेजवर 8 ते 10 फूट उंच बॅरीकेडींग केली जाणार आहे, जेणेकरुन लोक फोटो काढण्याच्या नादात खाली उतरु नयेत. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नदीकिनारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जर कोणी व्यक्ती गंगा बॅरेजवरुन खाली उतरुन फोटो काढण्यासाठी किंवा आंघोळीसाठी गेली तर त्याला अटक करण्यात येईल.
 

Web Title: Ganga will be able to take bath or photo on the banks of river banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.