तीन पिढ्यांपासून गुन्हेगारी क्षेत्रात, महाराष्ट्र, गोवा, गुजरातमध्ये धुमाकूळ, आंतरराज्य चोरांची टोळी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:52 IST2025-01-10T11:51:05+5:302025-01-10T11:52:35+5:30
Crime News: गुजरातमधील बडोदा येथील पोलिसांना चोरांच्या एका १२ सदस्यीय आंतरराज्य टोळीळा बेड्या ठोकल्या आहेत. या चोरांच्या टोळीने महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात राज्यात मिळून चोरीचे सुमारे २५ गुन्हे केले होते.

तीन पिढ्यांपासून गुन्हेगारी क्षेत्रात, महाराष्ट्र, गोवा, गुजरातमध्ये धुमाकूळ, आंतरराज्य चोरांची टोळी गजाआड
गुजरातमधील बडोदा येथील पोलिसांना चोरांच्या एका १२ सदस्यीय आंतरराज्य टोळीळा बेड्या ठोकल्या आहेत. या चोरांच्या टोळीने महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात राज्यात मिळून चोरीचे सुमारे २५ गुन्हे केले होते. एकट्या बडोद्यामध्ये या चोरट्यांनी ५ चोऱ्या केल्या होत्या. ही टोळी कारमधून लॅपटॉप आणि इतर सामान चोरी करण्यात पटाईत होती. या टोलीमधील र्व १२ सदस्य हे तामिळनाडूमधील त्रिची येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी या टोळीकडून १७ मोबाईल फोन, लॉपटॉप आमि १० लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बडोद्याच्या जेसीपी लीना पाटील यांनी सांगितले की, ही टोळी महागड्या कारनां लक्ष्य करत असे. मागच्या वर्षी अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमामध्ये आलेल्या पाहुण्यांच्या कारनांही या चोरट्यांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कडोकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे त्यांना चोरी करता आली नव्हती. या टोळीमधील सर्व सदस्यांची कुटुंबं ही अनेक पिढ्यांपासून चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असल्याची माहितीही समोर आली आहे.
या टोळीचा म्होरक्या असलेल्या जगन बालसुब्रह्मण्यम याची चोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असलेली ही तिसरी पिढी आहे. या टोळीमध्ये एका इंजिनियरचाही समावेश आहे. तो चोरी केलेल्या इलेक्ट्रॉनिक्सचे पार्ट तोडून डिसमेन्टल करण्यामध्ये एक्स्पर्ट आहे. काही काळापूर्वी त्यांनी शिर्डीमध्येही चोरी केली होती. आता पोलीस या टोळीशी आणखी कोण कोण लोक संबंधित आहेत, याचा तपास करत आहेत.