मुसेवाला हत्येतील गँगस्टर टीनू फरार; गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 06:43 AM2022-10-03T06:43:01+5:302022-10-03T06:44:28+5:30

अन्य एका प्रकरणात एका स्थानिक न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना दीपक टीनू फरार झाला. 

gangster deepak tinu absconding in moosewala murder a close associate of gangster lawrence bishnoi | मुसेवाला हत्येतील गँगस्टर टीनू फरार; गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी

मुसेवाला हत्येतील गँगस्टर टीनू फरार; गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी

Next

चंडीगड: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी गँगस्टर दीपक टीनू हा पंजाबच्या मानसा जिल्ह्यातून पोलिसांच्या तावडीतून पळाला आहे. सूत्रांनी सांगितले की, टीनूला पकडण्यासाठी तपास अभियान सुरू आहे. मानसा पोलीस शनिवारी रात्री त्याला अन्य एका प्रकरणात गोइंदरवाल साहिब तुरुंगातून एका स्थानिक न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात होते. त्याचवेळी तो फरार झाला. 

दीपक टीनू हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी आहे. मुसेवाला हत्याकांडात बिश्नोई हा प्रमुख आरोपी आहे. या घटनेबाबत विचारणा केली असता पटियाला विभागाचे महानिरीक्षक मुखविंदर सिंग छिना यांनी सांगितले की, आम्ही त्याला लवकरच पकडू. पंजाबच्या मानसा जिल्ह्यात २९ मे रोजी मुसेवाला नावाने प्रसिद्ध असलेले गायक शुभदीप सिंग सिद्धू यांची गोळी मारून हत्या झाली होती. बिश्नोई टोळीचा सदस्य गोल्डी बराड याने हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. टीनू २४ आरोपींमधील एक आहे.  (वृत्तसंस्था)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: gangster deepak tinu absconding in moosewala murder a close associate of gangster lawrence bishnoi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.