कैद्याच्या पाठीवर गरम सळईने लिहिले 'गँगस्टर', न्यायाधीशांसमोर शर्ट काढून दाखवली जखम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 06:32 PM2022-08-18T18:32:56+5:302022-08-18T18:33:46+5:30

कारागृहाच्या सुरक्षा रक्षकांनी गरम लोखंडी रॉडने पाठीवर 'गँगस्टर' लिहिल्याचा आरोप कैद्याने केला आहे.

'Gangster' written on the prisoner's back with hot iron rod, he took off his shirt and showed the wound in front of the judge | कैद्याच्या पाठीवर गरम सळईने लिहिले 'गँगस्टर', न्यायाधीशांसमोर शर्ट काढून दाखवली जखम

कैद्याच्या पाठीवर गरम सळईने लिहिले 'गँगस्टर', न्यायाधीशांसमोर शर्ट काढून दाखवली जखम

Next

पिरोजपूर:पंजाबच्या फिरोजपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारागृहाच्या सुरक्षा रक्षकांनी गरम लोखंडी रॉडने पाठीवर 'गँगस्टर' लिहिल्याचा आरोप कैद्याने केला आहे. कैदी तरसेम सिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात त्याच्या पाठीवर गरम रॉडने गँगस्टर लिहिल्याचे दिसत आहे. तरसेम सिंग दरोड्याच्या गुन्ह्यात 2017 पासून कैदेत आहे. हिंदुस्तान टाईम्सने याबाबतचा व्हिडिओ शेअर केला हाे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरसेमला बुधवारी कपूरथला न्यायालयात हजर करण्यात आले होते, तिथे त्याने न्यायाधीशांना शर्ट काढून पाठीवरची जखमी दाखवली आणि तुरुंगातील कर्मचाऱ्यांवर छळाचा आरोप केला. आपल्या जीवाला धोका असल्याचा दावाही त्याने यावेळी केला. जिल्हा व सत्र न्यायाधीश राकेश कुमार यांनी कैद्याला वैद्यकीय तपासणीसाठी कपूरथळा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्याचे आणि 20 ऑगस्टला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

याप्रकरणाची पुढील सुनावणी 24 ऑगस्ट रोजी होणार आहे. दरम्यान, तुरुंग प्रशासनाने कैद्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. हे प्रकरण काही दिवसांपूर्वीचे असून, तुरुंग प्रशासनाला टार्गेट करण्यासाठी तरसेमनेच दुसऱ्या कैद्याकडून पाठीवर हे लिहून घेतल्याचे त्यांचे म्हणने आहे. तरसेम सिंगच्या पालकांनी त्यांच्या मुलावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याचा दावा केला आहे.

Web Title: 'Gangster' written on the prisoner's back with hot iron rod, he took off his shirt and showed the wound in front of the judge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.