पोलीस बंदोबस्तात गोलाणीतील ओटे केले रिकामे
By admin | Published: March 29, 2016 12:25 AM2016-03-29T00:25:39+5:302016-03-29T00:25:39+5:30
जळगाव: मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने सोमवारी पोलीस बंदोबस्तात गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर असलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली.
Next
ज गाव: मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने सोमवारी पोलीस बंदोबस्तात गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर असलेले अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. चौबे मार्केट ते सुभाष चौक व तेथून कोंबडीबाजार चौकापर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात येणार असून तेथील हॉकर्सचे गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर स्थलांतर करण्यात येणार आहे. मात्र गोलाणी मार्केटमध्ये मनपाच्या दप्तरी असलेल्या नोंदी नुसार केवळ ७२ हॉकर्स अधिकृत असताना मोठ्या प्रमाणात ओटे अडवून ठेवलेले असल्याचे आढळून आल्याने गोलाणीतील ओटे अतिक्रमण हटवून रिकामे करण्याची कारवाई या हॉकर्सच्या स्थलांतरापूर्वी करणे आवश्यक होते. त्यानुसार मनपाच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी सकाळी अकरा वाजेपासून पोलिस बंदोबस्तात ही कारवाई सुरू केली. वादावादी व विरोधमनपा अतिक्रमण विभागाचे पथक तसेच किरकोळ वसुली विभागाच्या कर्मचार्यांच्या मदतीने हे ओटे रिकामे करण्याचे काम सुरू झाले. मात्र काही हॉकर्सनी आम्ही अनेक वर्षांपासून येथे व्यवसाय करीत असून कागदपत्र असल्याचाही दावा केला. मात्र मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने त्यांच्या यादीत नसलेल्या ओटेधारकांचे ओटे रिकामे करून घेतले. सामान हटविण्यास मुदतमात्र ओट्यांवरील हॉकर्सची नाराजी नको, म्हणून त्यांचे सामान जप्त न करता त्यांना ते हटविण्यास मुदत देण्यात आली. व्हीडीओ चित्रीकरण करीत ही मोहीम राबविण्यात आली. हॉकर्सवर अन्यायमनपा प्रशासनाकडून ओट्यावर अनेक वर्षांपासून व्यवसाय करणार्या हॉकर्सवर अन्याय केला जात असल्याचा आरोप यावेळी हॉकर्सनी केला. कमलबाई श्रावण चौधरी या महिलेने कारवाईसाठी आलेल्या पथकाला मला कोणीच नाही. मी अनेक वर्षांपासून येथेच व्यवसाय करीत असल्याचे सांगूनही सामान हटविण्याची कारवाई करण्यात आली. चौधरी यांनी सांगितले की, त्या आजारी असल्याने गेल्या काही महिन्यांपासून घरीच होते. आता बरे वाटल्याने पुन्हा या जागेवर व्यवसाय करीत असल्याचे सांगितले. तर अशोक माळी म्हणाले की, फुले मार्केटच्या जागेवर असलेल्या डेली बाजारमधील हॉकर्सला त्या जागेच्या बदल्यात ही गोलाणीतील ओट्यांची जागा कायमस्वरूपी दिली होती. मात्र करार केले नाही. आता मात्र कराराची मुदत संपली आहे, असे सांगितले जात आहे. सुधाकर वाणी या वृद्ध हॉकरलाही ५६ नंबरच्या ओट्यावरून १०४ नंबरच्या ओट्यावर जाण्यास सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी चिडून या पथकासमोर कागदपत्र टाकत जाब विचारला. ८९ सालापासून या ओट्यावर व्यवसाय करीत आहे. तरीही दादागिरी करून ओटा हिसकावून घेतला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र त्यांचे ऐकून घेताच दिलेल्या ओट्यावर जाण्यास सांगण्यात आले. ओटे विकणार्यांचे काय?ओटेधारकांपैकी राजेंद्र वाणी, विजय शिंपी, रफिक पिंजारी आदींनी मनपाच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. वास्तविक ३हजार रुपयांत कायमस्वरूपी वापरावासाठी हा ओटा दिलेला असताना २००८ मध्ये ओट्यांची मुदत संपल्याचे मनपाकडून सांगितले जात आहे. मग गाळेधारकांप्रमाणे ओटेधारकांना तेव्हाच नोटीस का बजावली नाही? तसेच ज्यांनी ओटे दुसर्यांना विकून टाकले. त्यांच्यावर काय कारवाई केली? असा सवाल केला.