गरेवाल होते काँग्रेसचे कार्यकर्ते - व्ही. के. सिंह यांचा दावा
By admin | Published: November 3, 2016 04:53 PM2016-11-03T16:53:03+5:302016-11-03T17:56:35+5:30
गरेवाल हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते, असा दावा सिंह यांनी केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - वन रँक वन पेन्शनच्या मागणीवरून आत्महत्या करणारे माजी सैनिक राम किशन गरेवाल यांच्याबाबत माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. गरेवाल हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते, तसेच त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकही लढवली होती, असा दावा सिंह यांनी केला आहे.
" राम किशन गरेवाल हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकही लढवली होती. मात्र त्यांच्या आत्महत्येची घटना ही दुर्दैवी आहे, असे व्ही. के. सिंह एएनआयशी बोलताना म्हणाले. तसेच ग्रेवाल यांनी ज्या पद्धतीने आत्महत्या केली, त्याबाबतही शंका उपस्थित केली आहे. "गरेवाल हे आमच्याकडे आले असते आणि आम्ही त्यांची मदत केली नसती तर आम्हाला दोषी ठरवता आले असते," असे सिंह म्हणाले.
सिंह यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी सिंह यांच्यावर सडकून टीका केली आहे. "सिंह यांच्या मानसिक स्थितीची तपासणी करण्याची आवश्यकता असून, अशा व्यक्तीला नावाच्या आधी जनरल ही उपाधी लावणे शोभत नाही," असे बब्बर म्हणाले. याआधी कालही सिंह यांनी गरेवाल यांच्या मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वाद ओढवून घेतला होता.
He was a Congress worker and who fought Sarpanch election on Congress ticket. His suicide is unfortunate: VK Singh on Ex-serviceman suicide pic.twitter.com/vMFCvDQGHN
— ANI (@ANI_news) November 3, 2016
If he had reached out to us and didn't get help, then it was our fault: VK Singh on Ex-serviceman's suicide pic.twitter.com/kZcVKmUip3
— ANI (@ANI_news) November 3, 2016
His mental condition needs to be examined, shameful that such a person writes 'General' before his name: Raj Babbar,Congress on VK Singh pic.twitter.com/fPuArVydLS
— ANI (@ANI_news) November 3, 2016