गरीब रथ एक्स्प्रेसचा प्रवास महागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 04:59 AM2018-07-16T04:59:25+5:302018-07-16T04:59:30+5:30

मध्यमवर्गीयांना कमी दरात एसी रेल्वे प्रवासाचा आनंद लुटता यावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘गरीब रथ एक्स्पे्रेस’ गाड्यांचा प्रवास आता महाग होणार आहे.

 Garib Rath Express will be expensive! | गरीब रथ एक्स्प्रेसचा प्रवास महागणार!

गरीब रथ एक्स्प्रेसचा प्रवास महागणार!

googlenewsNext

नवी दिल्ली : मध्यमवर्गीयांना कमी दरात एसी रेल्वे प्रवासाचा आनंद लुटता यावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘गरीब रथ एक्स्पे्रेस’ गाड्यांचा प्रवास आता महाग होणार आहे. रेल्वेत देण्यात येणाऱ्या बेडरोलचे शुल्क तिकिटात समाविष्ट करण्यात येणार असल्याने तिकीट दर वाढणार आहेत.
२००६ साली प्रत्येक बेडरोलचे शुल्क २५ रुपये ठरविण्यात आले होते. मात्र त्यानंतर बारा वर्षे झाली तरी या शुल्काचा फेरआढावा घेऊन त्यात वाढ न केल्याने कॅगने रेल्वेचे नुकतेच कान उपटले होते. येत्या सहा
महिन्यांत वाढीव शुल्क लागू
होणार आहे. त्यामुळे बेडरोलची सुविधा उपलब्ध असलेल्या सर्वच गाड्यांच्या तिकिटात वाढ होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, बेडरोलच्या देखभालीचा खर्च गेल्या काही वर्षांत वाढलेला असूनही गरीब रथ एक्स्प्रेसच्या तिकिटात त्याच्या शुल्काचा समावेश का केला नाही अशी विचारणा डेप्युटी कॉम्प्ट्रोलर अँड आॅडिटर जनरल (कॅग)च्या कार्यालयाने रेल्वेकडे नुकतीच केली होती. गरीब रथ व दुरान्तो एक्स्प्रेस या गाड्यांच्या तिकिटांमध्ये बेडरोलच्या शुल्काचा समावेश नसतो.
>या असते बेडरोल : दोन चादरी, एक टॉवेल, एक उशी,
एक ब्लँकेट.
कॅगने काय म्हटले होते?
बेडरोल किटची धुलार्ई, त्यांच्या वितरणासाठी नेमलेल्या कर्मचारीवर्ग, हे किट ठेवण्यासाठी रेल्वेगाडीत लागणाºया जागेपोटी येणारा तसेच देखभालीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे बेडरोलच्या शुल्काचा फेरआढावा घेऊन त्यात वाढ करणे आवश्यक बनले आहे

Web Title:  Garib Rath Express will be expensive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.