‘गरिबी हटाओ’ची मोदींकडून खिल्ली
By admin | Published: June 3, 2016 03:00 AM2016-06-03T03:00:04+5:302016-06-03T03:00:04+5:30
‘गरिबी हटाओ’चा नारा ज्यांनी दिला होता, त्यांचा हेतू चांगला असेलही, परंतु त्यांनी हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी निवडलेला मार्ग मात्र अयोग्य होता, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी
बालासोर (ओडिशा) : ‘गरिबी हटाओ’चा नारा ज्यांनी दिला होता, त्यांचा हेतू चांगला असेलही, परंतु त्यांनी हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी निवडलेला मार्ग मात्र अयोग्य होता, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या या घोषणेची खिल्ली उडविली.
ओडिशाच्या बालासोर येथे एका रॅलीला संबोधित करताना मोदी बोलत होते. त्यांनी ‘संतुलित’ विकासाचे आवाहन केले आणि नैसर्गिक संसाधनांनी युक्त असलेला पूर्व भाग मागासलेला असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. ओडिशा, पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि आसामच्या विकासाची गरज असल्याचे सांगून मोदी म्हणाले, ‘माझे सरकार गरिबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. गरीब हाच आमच्या सर्व योजनांच्या केंद्रस्थानी असेल. त्यासाठीची योजना आमच्या सरकारने तयार केली असून, या योजनेचा प्रत्यक्ष परिणाम तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल.’
मोदींनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे प्रत्यक्ष नाव न घेता, टीका केली. ज्या राज्यात भाजपाची सत्ता नाही, तेथील अवस्था काय आहे, हे तुम्हीच अधिक जाणता, असे सांगून ते म्हणाले की, या राज्यातही आता बदल होणे गरजेचे बनले आहे. निवडणुका, आंदोलने, नसतानाही बालासोरसारख्या सिटीमध्ये माझे भाषण ऐकायला तुम्ही आला आहात. याचा अर्थच मुळी तुमचा सरकारवर विश्वास आहे. माझे सरकार देशातील गरिबांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे, असे मी याआधीही सांगितले होते. जेव्हा मी हे सांगितले तेव्हा माझा उद्देश कोणतेही राज्य वा क्षेत्र विकासाच्या बाबतीत मागासलेले राहू नये हा होता. संतुलित विकास झाला पाहिजे आणि त्याचा प्रत्येकालाच फायदा झाला पाहिजे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, आमचे सरकार प्रामाणिकपणे काम करीत आहे, हे लक्षात घेतले तरच तुम्हाला आम्ही घेतलेल्या निर्णयांच्या फायद्याकडे पाहता येईल. गरिबी दूर करण्यासाठीही जनतेने केंद्र सरकारला सहकार्य करणे आवश्यक आहे.
संतुलित विकासाचे आवाहन
ओडिशाच्या बालासोर येथे एका रॅलीला संबोधित करताना मोदी बोलत होते. त्यांनी ‘संतुलित’ विकासाचे आवाहन केले आणि नैसर्गिक संसाधनांनी युक्त असलेला पूर्व भाग मागासलेला असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
आम्ही गेल्या ६० वर्षांपासून गरिबी हटाओ हा नारा ऐकत आलो आहोत. हा नारा देणाऱ्यांच्या हेतूवर मला शंका घ्यायची नाही. पण त्यांनी यासाठी निवडलेला मार्ग चुकीचा होता. कारण गरिबी, बेरोजगारी आणि रोगराई वाढतच गेली आहे. सरकार श्रीमंतांसाठी नसते. गरिबांसाठी असते. समस्येचे शास्त्रीय कारण शोधत नाही तोपर्यंत गरिबी हटणार नाही.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान