गरीबरथ एक्स्प्रेस होणार बंद; हमसफर एक्स्प्रेस सुरू करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 01:31 AM2018-09-07T01:31:26+5:302018-09-07T01:31:36+5:30
गरीब जनतेला स्वस्तात रेल्वेप्रवास करता यावा, यासाठी २००५ साली सुरू केलेल्या गरीबरथ एक्स्प्रेस गाड्या आता लवकरच बंद होणार आहेत. त्याऐवजी हमसफर एक्स्प्रेस सुरू करण्याचे रेल्वेने ठरविले आहे.
नवी दिल्ली : गरीब जनतेला स्वस्तात रेल्वेप्रवास करता यावा, यासाठी २००५ साली सुरू केलेल्या गरीबरथ एक्स्प्रेस गाड्या आता लवकरच बंद होणार आहेत. त्याऐवजी हमसफर एक्स्प्रेस सुरू करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. अर्थात त्यांचे भाडे गरीबरथपेक्षा अधिक असेल.
रेल्वे बोर्डाच्या या निर्णयामुळे गरिबांचा आरामदायी प्रवास बंद होणार असून त्यांना प्रवासासाठी जादा भाडे मोजावे लागेल. गरीबरथ एक्स्प्रेसमधून कमी भाड्यात थ्री टायर एसीने प्रवास करता येत होते. गरीबरथच्या डब्यांची दुरुस्ती करणे शक्य नसल्याने त्या बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. दिल्ली-चेन्नई मार्गावर चालणारी गरीबरथ एक्स्प्रेस सर्वात आधी बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने अन्य मार्गांवरील गरीबरथ एक्स्प्रेसही बंद करण्यात येतील. तशा सूचना रेल्वे बोर्डाने दक्षिण व उत्तर विभागाला दिल्या आहेत.