ग्राहकांना दिलासा! गॅस सिलेंडरचे दर घटले; १ ऑगस्टपासून झाले 'हे' मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 08:50 AM2023-08-01T08:50:43+5:302023-08-01T08:51:06+5:30

सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात.

Gas cylinder rates reduced; 6 big changes in india from August 1 | ग्राहकांना दिलासा! गॅस सिलेंडरचे दर घटले; १ ऑगस्टपासून झाले 'हे' मोठे बदल

ग्राहकांना दिलासा! गॅस सिलेंडरचे दर घटले; १ ऑगस्टपासून झाले 'हे' मोठे बदल

googlenewsNext

नवी दिल्ली – आजपासून नवीन महिन्याची सुरुवात झाली आहे. १ ऑगस्ट २०२३ पासून देशातील अनेक नियमात बदल झाले आहेत. ज्याचा सर्वसामान्य माणसाच्या बजेटवर परिणाम होणार आहे. घरगुती गॅसच्या किंमतीपासून ते नवीन घर खरेदीच्या नियमापर्यंत अनेक बदल झालेत. त्याशिवाय क्रेडिट कार्ड ते इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याच्या नियमांतही बदल झाले आहेत. जाणून घेऊन ऑगस्ट २०२३ पासून काय काय बदललंय?

ITR भरण्यासाठी भरावा लागणार दंड

आर्थिक वर्ष २०२२-२३ या काळातील इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख होती. परंतु या मुदतीत ज्यांनी रिटर्न भरला नसेल त्यांना आता दंड भरावा लागेल. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी ५ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना १ हजार रुपये, ५ लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना ५ हजार रुपये विलंब शुल्क म्हणून आकारले जातील. तसेच ३१ डिसेंबर २०२३ नंतर जे ITR फाईल करतील त्यांना १० हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.

व्यावसायिक LPG स्वस्त झाला

ऑईल कंपन्यांनी यंदा व्यावसायिक गॅसच्या किंमतीत घट केली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कुठलाही बदल झाला नाही. सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात. मागील महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात बदल झाला होता. १ ऑगस्टपासून पेट्रोलियन कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये १०० रुपये दर कमी केले आहेत. याआधी ४ जुलै २०२३ रोजी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ७ रुपये वाढ केली होती.

बिल्डरला द्यावा लागणार QR कोड

महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरने विकासकांना १ ऑगस्टपासून सर्व जाहिरातींवर क्यूआर कोड लावण्यास सांगितले आहे जेणेकरून घर खरेदी करणाऱ्यांना त्याची माहिती मिळू शकेल. क्यूआर कोड नसणाऱ्या जाहिरातींवर ५० हजार रुपये दंड भरावा लागेल. दंड भरल्यानंतरही जो विकासक विना क्यूआर कोड जाहिरात देईल अशांवर आयोगामार्फत कारवाई करण्यात येणार आहे.

Axis Bank क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना फटका

तुम्ही Axis Bank क्रेडिट कार्ड धारकांसाठी १ ऑगस्ट २०२३ ही धक्कादायक तारीख आहे. बँक क्रेडिट कार्ड कॅशबॅक आणि प्रोत्साहन पाँईंट कमी करणार आहे. आता यामध्ये फक्त १.५ टक्के कॅशबॅक मिळणार आहे. Axis बँक फ्लिपकार्ट क्रेडिट कार्ड धारकांसाठी हा बदल करणार आहे, जो १२ ऑगस्टपासून लागू होईल.

बासमती तांदूळसाठी मानक

FSSI ने भारतात प्रथमच बासमती तांदळासाठी मानके निश्चित केली आहेत, जी १ ऑगस्टपासून लागू होतील. FSSI निश्चित मानकाची अपेक्षा अशी आहे की, ग्राहकांच्या हिताचे रक्षण होईल. बाजारात विकल्या जाणाऱ्या बासमती तांदळाचा स्पेशल सुगंध असतो. त्यात कुठलाही कृत्रिम सुगंध नको.

ई-चलान योजना

१ ऑगस्टपासून बहुतांश व्यवसाय ई-इनव्हॉइसिंग योजनेत आणले जातील. याचा उद्देश बिझनेस टू बिझनेस विक्रीचा रेकॉर्ड ठेवणे, छोट्या व्यावसायिकांना विना जीएसटी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे विक्री करण्याची परवानगी दिली जाईल. ई-इनव्हॉइस योजना किरकोळ स्तरावरील विक्रीशिवाय इतर सर्व विक्री कव्हर करते.

Web Title: Gas cylinder rates reduced; 6 big changes in india from August 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.