Gas Cylinder's New Price : सर्वसामान्यांना दिलासा! गॅस सिलिंडरच्या किमती झाल्या कमी, जाणून घ्या नवे दर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 01:04 PM2020-04-01T13:04:33+5:302020-04-01T13:27:53+5:30
लॉकडाऊन दरम्यान सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण विना अनुदानित LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊन दरम्यान सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण विना अनुदानित LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. सिलिंडरच्या किमतीत तेल कंपन्यांनी मोठी कपात केली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये विना अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 1 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून 61 आणि 62 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 65 रुपयांनी तर चेन्नईमध्ये 64.50 रुपयांनी कमी झाली आहे. दिल्लीत विना अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 774 रुपये आहे. तर कोलकातामध्ये 774 रुपये, मुंबईत 714.50 आणि चेन्नईमध्ये 761.50 रुपये आहे. 1 एप्रिलपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. याआधी एक मार्चला गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या होत्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत 3 महिन्यांपर्यंत एलपीजी घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्याचा 8 कोटी महिलांना फायदा होणार आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत 8 कोटी बीपीएल कुटुंबीयांना तीन महिन्यांपर्यंत मोफत सिलिंडर मिळणार आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शन दिलं जातं. या योजनेत बदल करण्यात आला असून, 1 ऑगस्ट 2019 पर्यंत जोडलेल्या ग्राहकांना आता याचा फायदा घेता येणार आहे. तेल कंपन्यांनी जुलै 2020 पर्यंत ईएमआय पुनर्प्राप्ती योजना पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : 'मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही', मौलानांची 'ती' ऑडिओ क्लीप व्हायरल
coronavirus : कोण आहे तबलीग जमात? काय आहे मरकजचा अर्थ? जाणून घ्या
Coronavirus : चिंताजनक! भारतातील 'ही' नऊ ठिकाणे ठरली कोरोनाचे हॉटस्पॉट, गाठली धोक्याची पातळी
Coronavirus : ...म्हणून 'त्या' जोडप्याने आपल्या मुलाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन'
coronavirus : अमेरिका, युरोप कोरोनसमोर हतबल, जगभरात कोरोनामुळे 42 हजार जण मृत्युमुखी
दिल्लीतील संमेलनातून देशभर कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव; महाराष्ट्रातून १०९ भाविक झाले होते सहभागी