गॅस सिलिंडर २५० रूपयांनी महागणार?
By admin | Published: July 4, 2014 04:09 PM2014-07-04T16:09:38+5:302014-07-04T16:09:38+5:30
तेरावा सिलिंडर साडे सोळा रूपयांनी महाग केलेला असतानाच आता येत्या काही दिवसात घरगुती गॅस सिलिंडर तब्बल २५० रूपयांनी महागण्याची शक्यता आहे.
Next
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ४ - तेरावा सिलिंडर साडे सोळा रूपयांनी महाग केलेला असतानाच आता येत्या काही दिवसात घरगुती गॅस सिलिंडर तब्बल २५० रूपयांनी महागण्याची शक्यता आहे.
गॅस सिलिंडर आणि केरोसिनच्या दरात वाढ करण्याची सिफारस पेट्रोलियम मंत्रालयाने शुक्रवारी केली आहे. या सिफारशीवर मोदी सरकार कोणता निर्णय घेणार यावर सिलिंडरची किंमत ठरणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने केलेल्या सिफारशीनुसार केरोसिनच्या दरात ४ ते ५ रूपयांची तसेच गॅस सिलिंडरच्या दरात २५० रूपयांची वाढ करण्याची सिफारस करण्यात आली आहे. दरवाढ करण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटीकल अफेअर्स अर्था सीसीपीए यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवला आहे. गॅस, केरोसिनबरोबरच डिझेलच्या दरात दर महिन्याला ४० ते ५० पैशांच्या दरवाढीसाठी सीसीपीएला पेट्रोलियम मंत्रालय शिफारस करणार असल्याची माहिती आहे. देशात नरेंद्र मोदी यांचे नवीन सरकार स्थापन झाल्यापासून महागाई कमी झाली नसून उलट ती अधिक वाढताना दिसत आहे. मोदी सरकारमधील रेल्वेमंत्रालयाने नुकतीच रेल्वे दरात भरमसाठ वाढ केली होती यावरून या सरकारवर चौफेर टीका करण्यात आली होती. हेच का तुमचे 'अच्छे दिन' असे म्हणत अनेकांनी सोशल नेटवर्क साईटस् वरही आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. गॅस सिलिंडरच्या भावात एकाचवेळी २५० रूपयांची दरवाढ करण्यात आली तर मोदी सरकारला पुन्हा जनतेच्या टीकेला सामोरे जावे लागेल.