विशाखापट्टणमनंतर आता छत्तीसगडच्या पेपर मिलमध्ये गॅस गळती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 06:41 PM2020-05-07T18:41:20+5:302020-05-07T18:52:34+5:30

विशाखापट्टनमनंतर छत्तीसगडच्या एका पेपर मिलमध्येही गॅस गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. 

gas leak accident 7 labourers of chhattisgarh paper mill SSS | विशाखापट्टणमनंतर आता छत्तीसगडच्या पेपर मिलमध्ये गॅस गळती

विशाखापट्टणमनंतर आता छत्तीसगडच्या पेपर मिलमध्ये गॅस गळती

Next

आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे गुरुवारी (7 मे) विषारी गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. या गॅस गळतीमुळे शहरात आतापर्यंत 8 ते 10 जणांच्या मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. 300 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच 5 हजारांपेक्षा जास्त लोक या गॅसगळतीनं आजारी पडले आहेत. ही घटना ताजी असतानाच आणखी एका ठिकाणी गॅस गळती झाल्याची माहिती मिळत आहे. विशाखापट्टणमनंतर छत्तीसगडच्या एका पेपर मिलमध्येही गॅस गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. 

छत्तीसगडमध्ये झालेल्या गॅस गळतीमुळे सात मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सात पैकी तीन मजुरांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधल्या रायगड जिल्ह्यातील 'शक्ती प्लस पेपर्स' या पेपर मिलमध्ये ही घटना घडली. प्लान्टच्या साफसफाईचं काम सुरू असताना ही घटना घडली. गॅस गळतीमुळे मजुरांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून छत्तीसगडमधील ही मिल बंद आहे. मिल पुन्हा सुरू करण्यासाठी आज मालकाने प्लान्टच्या साफसफाईचं काम करण्यासाठी काही मजुरांना बोलावलं होतं. हे काम सुरू असताना अचानक ही घटना घडली असून याचा सात मजुरांना त्रास झाला. त्यातील तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

विशाखापट्टणम येथे गुरुवारी (7 मे) विषारी गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. या गॅस गळतीमुळे शहरात आतापर्यंत 8 ते 10 जणांच्या मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. 300 हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच 5 हजारांपेक्षा जास्त लोक या गॅसगळतीनं आजारी पडले आहेत. या सर्व प्रकारावर विशाखापट्टणमच्या पश्चिम विभागाच्या एसीपींनी माहिती दिली आहे. 5000 टनाच्या दोन टँकमधून ही  गॅसगळती झाली आहे. या गॅसगळतीची गंभीर दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vizag Gas Leak : आंध्र प्रदेशला सर्वोतोपरी मदत करणार; पंतप्रधान मोदींनी केली मुख्यमंत्र्यांशी चर्चा

लॉकडाऊनमध्ये SBI ने ग्राहकांना दिला अलर्ट! ...तर खातं होऊ शकतं रिकामं, वेळीच व्हा सावध

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! ATMमधून पैसे काढायला घाबरता?, मग 'या' दुकानातून काढू शकता रक्कम

CoronaVirus News : योगी सरकारच्या निर्णयावर साक्षी महाराज नाराज; म्हणाले...

CoronaVirus News : 'कोरोना व्हायरसचा प्रसार वुहानच्या प्रयोगशाळेतून झाला'; अमेरिका ठाम

 

Web Title: gas leak accident 7 labourers of chhattisgarh paper mill SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.