गुजरातमध्ये काँग्रेससमोर पक्षातील गळती थांबविण्याचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 09:19 AM2017-07-29T09:19:23+5:302017-07-29T09:21:35+5:30

गुजरात काँग्रेसला आणखी तीन आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिल्यामुळे शुक्रवारी मोठा फटका बसला आहे. गुरूवारपासून सुरू झालेलं हे राजीनामा सत्र पाहता आजपर्यत एकुण 6 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

gaujaraatamadhayae-kaangaraesasamaora-pakasaataila-galatai-thaanbavainayaacan-avahaana | गुजरातमध्ये काँग्रेससमोर पक्षातील गळती थांबविण्याचं आव्हान

गुजरातमध्ये काँग्रेससमोर पक्षातील गळती थांबविण्याचं आव्हान

Next
ठळक मुद्देगुजरात काँग्रेसला आणखी तीन आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिल्यामुळे शुक्रवारी मोठा फटका बसला आहे.गुरूवारपासून सुरू झालेलं हे राजीनामा सत्र पाहता आजपर्यत एकुण 6 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षामध्ये सुरू झालेल्या या गळतीमुळे गुजरात काँग्रेस पक्षाकडून आता पक्षात एकजूट आणण्यासाठी कवायत केली जाते आहे. विशेष म्हणजे येत्या एक-दोन दिवसात आणखीनही आमदार राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तविली जाते आहे.

अहमदाबाद, दि. 29- गुजरात काँग्रेसला आणखी तीन आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिल्यामुळे शुक्रवारी मोठा फटका बसला आहे. गुरूवारपासून सुरू झालेलं हे राजीनामा सत्र पाहता आजपर्यत एकुण 6 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षामध्ये सुरू झालेल्या या गळतीमुळे गुजरात काँग्रेस पक्षाकडून आता पक्षात एकजूट आणण्यासाठी कवायत केली जाते आहे. विशेष म्हणजे येत्या एक-दोन दिवसात आणखीनही आमदार राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तविली जाते आहे. पक्षातील या सगळ्या घडामोडींमुळे काँग्रेसने शुक्रवारी भाजपवर पैसा आणि सत्तेच्या बळावर काँग्रेसमध्ये फूट पाडल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे सध्या पक्षात असलेल्या आमदारांनाही तंबी दिली. जर पक्ष सोडून गेलात तर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, अशा शब्दात काँग्रेसने आमदारांना खडसावलं. शुक्रवारी बालासिनोर मतदारसंघाचे आमदार मानसिंह चौहान यांनी राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष रमणलाल व्होरा यांना सकाळी दिला. वन्सदा येथील आमदार छन्नाभाई चौधरी यांनी अध्यक्षांकडे त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री राजीनामा सुपुर्द केला. तर काँग्रेसचे आमदार राघव पटेल यांनी लवकरच इतर पाच आमदारांसह राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. 
प्रतिष्ठेचा मुद्दा
8 ऑगस्ट रोजी होणारी निवडणूक हा काँग्रेससमोरील सगळ्यात मोठ्या चिंतेचा विषय आहे. ८ ऑगस्ट रोजी राज्यात राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होते आहे. यामध्ये एक जागा काँग्रेसकडे आहे तर इतर दोन जागा भाजपकडे आहेत. भाजपकडून पैशांचा वापर करून तिसरी जागा हडप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातो आहे. भाजपकडून त्या तिसऱ्या जागेसाठी बलवंत सिंह राजपूत यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसने राज्यसभेसाठी अहमद पटेल यांना उमेदवारी दिली आहे. गुजरातमधील नव्या समीकरणानुसार अहमद पटेल यांची जागा फसेल अशी चिन्ह दिसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसकडे सध्या 57 आमदार आहेत. त्यापैकी 6 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर आमदारांची संख्या आता 51 झाली आहे. काँग्रेसला राज्यसभेतील जागा जिंकण्यासाठी एकुण 47 आमदारांची गरज आहे. पण पक्षामध्ये सुरू झालेल्या आमदारांच्या गळतीमुळे काँग्रेसच्या पारड्यातील आमदारांची संख्या कमी होत असून जागा जिंकण कठीण होत असल्याचं बोललं जातं आहे. अहमद पटेल यांची जागा जिंकणं हा काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. काँग्रेस पक्षातील सगळे महत्त्वाचे निर्णय हे अहमद पटेल यांच्याच सल्ल्याने घेतले गेल्याचं बोललं जातं.त्यामुळे अहमद पटेल यांना राज्यसभेतील जागा मिळवण्यासाठी काँग्रेसकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. 
 गळती थांबविण्याचा प्रयत्न
 गुजरातमधील काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पार्टीला अधिक फटका बसू नये व फुटीची शक्यता ओळखून काँग्रेसनं आपल्या 44 आमदारांना विमानाने बंगळुरू येथे पाठवल्याचे वृत्त समोर आले आहे. या 40 आमदारांना राज्यसभेची निवडणूक होईपर्यंत बंगळुरूमधील एका रिसोर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसमध्ये फोडाफोडीचं राजकारण करण्याचा भाजपाचा डाव यशस्वी होऊ नये, यासाठी आमदारांना बंगळुरूमध्ये पाठवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.    
 

Web Title: gaujaraatamadhayae-kaangaraesasamaora-pakasaataila-galatai-thaanbavainayaacan-avahaana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.