लडाखमध्ये चीन सीमेवर उंटांवरून गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 04:10 AM2017-12-29T04:10:59+5:302017-12-29T04:11:03+5:30

नवी दिल्ली : लडाखला लागून असलेल्या चीनसोबतच्या प्रत्यक्ष सीमारेषेवर गस्त घालण्यासाठी आणि त्या दुर्गम व खडतर भागात रसद पुरवठा करण्यासाठी खेचरांसोबत उंटांचाही वापर करण्याची लष्कराची योजना आहे.

Gauta on the China border in Ladakh | लडाखमध्ये चीन सीमेवर उंटांवरून गस्त

लडाखमध्ये चीन सीमेवर उंटांवरून गस्त

Next

नवी दिल्ली : लडाखला लागून असलेल्या चीनसोबतच्या प्रत्यक्ष सीमारेषेवर गस्त घालण्यासाठी आणि त्या दुर्गम व खडतर भागात रसद पुरवठा करण्यासाठी खेचरांसोबत उंटांचाही वापर करण्याची लष्कराची योजना आहे. सध्या या कामासाठी लडाखमध्ये खेचर आणि तट्टू (लहान घोडे) वापरले जातात.
सध्या यासाठी एक पथदर्शक योजना हाती घेण्यात आली असून काही निवडक उंटांना या कामासाठी प्रशिक्षित केले जात आहे. त्यात यश आले तर समुद्रसपाटीपासून १२ हजार ते १५,५०० फूट उंचीपर्यंतच्या लडाखच्या भागात गस्त व रसद वाहतूक यासाठी उंटांचा नियमित वापर केला जाऊ शकेल.
संरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या (डीआरडीओ) लेह येथील ‘डिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ हाय अ‍ॅल्टिट्यूड रीसर्च लॅबॉरेटरी’ने (दिहार) उंट किती वजन, किती उंचीपर्यंत व किती अंतर वाहून नेऊ शकतात यादृष्टीने संशोधन सुरू केले आहे. त्यासाठी उंटांना प्रशिक्षणही दिले जात आहे. सध्या देशाच्या पश्चिम सरहद्दीवर थारचे वाळवंट आणि राजस्थानमध्ये पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर गस्त घालण्यासाठी प्रामुख्याने सीमा सुरक्षा दलाकडून उंटांचा वापर केला जातो.
>हवामानाचा सराव
लष्कराने बिकानेर येथील राष्ट्रीय उंट संशोधन केंद्रातून एका वशिंडाचे चार उंट लडाखमध्ये आणले आहेत. त्यांना तेथील हवामानाचा सराव करणे व प्रशिक्षण देण्याचा काम सुरू आहे. दुसरीकडे ‘दिहार’ संस्थेने यंदाच्या फेब्रुवारीत दोन वशिंडांचे स्थानिक उंट आणून त्यांच्यावर काम सुरू केले आहे.
>उंट अधिक उपयुक्त
खेचर व तट्टू साधारणपणे ४० किलो ओझे वाहू शकतात. तट्टूंच्या तुलनेत दोन वशिंडांची चाल जलद असते व समाट रस्ता असेल तर ते दोन तासांत १० ते १५ किमीचे अंतर कापू शकतात. 2 वशिंडांच्या उंटांची ओझे वाहण्याची क्षमता १८० ते २२० किलोपर्यंत असते.
>दोन वशिंडे असलेल्या उंटांचा वापर होणार
यासाठी दोन वशिंडे असलेल्या (डबल हम्प्ड) व एका वशिंडाच्या उंटांचा वापर केला जाणार आहे. भारतात दोन वशिंडांचे उंट फक्त लडाखच्या न्युब्रा खोºयात आढळतात. सध्या तेथे असे सुमारे २०० उंट आहेत.नेहमी आढळणारे एका वशिंडांचे
उंट देशात राजस्थानसह अन्यत्र अहेत. दोन वशिंडांच्या उंटांना ‘बॅक्टिरियन’ तर एका वशिंडाच्या उंटाला ‘ड्रॉमेडरी’ म्हटले जाते.

Web Title: Gauta on the China border in Ladakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.