अदानींच्या विरोधात भारतीय लॉबीने रचली नकारात्मक कहाणी, 'आरएसएस'कडून समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 10:02 AM2023-02-04T10:02:26+5:302023-02-04T10:05:18+5:30

gautam adani : अदानीविरोधातील हिंडेनबर्ग रिपोर्ट हा सुनियोजित कटाचा भाग आहे, असे आरएसएसने म्हटले आहे. 

gautam adani caught in a negative narrative rss says indians created a negative narrative against adani | अदानींच्या विरोधात भारतीय लॉबीने रचली नकारात्मक कहाणी, 'आरएसएस'कडून समर्थन

अदानींच्या विरोधात भारतीय लॉबीने रचली नकारात्मक कहाणी, 'आरएसएस'कडून समर्थन

googlenewsNext

नवी दिल्ली : हिंडेनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टनंतर उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. दरम्यान, आता संकटांनी घेरलेल्या गौतम अदानींच्या समर्थनार्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) उतरला आहे. अदानीविरोधातील हिंडेनबर्ग रिपोर्ट हा सुनियोजित कटाचा भाग आहे, असे आरएसएसने म्हटले आहे. 

हिंडेनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टनंतर अदानी समूहाला मोठा फटका बसला असून जागतिक श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदानी 15व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. आरएसएसचे मुखपत्र ऑर्गनायझरने म्हटले आहे की, अदानी समूहावरील हल्ला हा भारतविरोधी जॉर्ज सोरोस यांनी बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ थायलंडचा नाश केला तसाच आहे. हिंडेनबर्ग रिपोर्ट हा अदानींच्या विरोधात भारतीयांच्या लॉबीने तयार केलेल्या नकारात्मक कहाणीचा भाग आहे.

भारतीय स्वयंसेवी संस्था नॅशनल फाऊंडेशन फॉर इंडियाला (एनएफआय)  सोरोस, फोर्ड फाउंडेशन, रॉकफेलर, ओमिडयार, बिल गेट्स आणि अझीम प्रेमजी यांच्याकडून निधी मिळतो. एनजीओ आयपीएसएमएफचीची सुरुवात अझीम प्रेमजी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती, जी डाव्या विचारसरणीशी संबंधित भारतातील काही चर्चित प्रोपेगंडा वेबसाइट्सना निधी पुरवते, असे ऑर्गनायझरने मुखपत्रात लिहिले आहे. 

अलीकडेच अदानी यांनी एनडीटीव्हीची हिस्सेदारी विकत घेतल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी वृत्तवाहिनीचा राजीनामा दिल्याचा उल्लेखही ऑर्गनायझरने केला आहे. तसेच, ऑर्गनायझरने मुखपत्रात म्हटले आहे की, एक पर्यावरणावर काम करणारी एनजीओ बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या समर्थनार्थ ट्विट का करेल. शेवटी त्यांचा खरा उद्देश काय आहे, असा सवाल ऑर्गनायझरने उपस्थित केला आहे.

याचबरोबर, ते काँग्रेस किंवा टीएमसी शासित राज्यांमध्ये अदानी प्रकल्पांना टारगेट करत नाहीत, असे ऑर्गनायझरने म्हटले. याशिवाय, काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधत ऑर्गनायझर मुखपत्राने राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी ते सहमत असल्याचे म्हटले आहे. तसेच, अदानी केवळ आपली मोदी समर्थकाची प्रतिमा काढून टाकण्यासाठी इतर राज्यांकडे वाटचाल करत असल्याचेही पुढे म्हटले आहे.

Web Title: gautam adani caught in a negative narrative rss says indians created a negative narrative against adani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.