Coromandal Express Accident: गौतम अदानी यांची मोठी घोषणा; कोरोमंडल ट्रेन अपघातातील मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2023 06:26 PM2023-06-04T18:26:05+5:302023-06-04T18:48:35+5:30

ओडिशा ट्रेन अपघातात आतापर्यंत सुमारे 288 जणांचा मृत्यू झाला अहे तर 1100 हून अधिक जखमी झाले आहेत.

Gautam Adani's big announcement; Coromandal express train accident; adani will bear the education expenses of the children of those killed in the train accident | Coromandal Express Accident: गौतम अदानी यांची मोठी घोषणा; कोरोमंडल ट्रेन अपघातातील मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

Coromandal Express Accident: गौतम अदानी यांची मोठी घोषणा; कोरोमंडल ट्रेन अपघातातील मृतांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

googlenewsNext

Coromandal Express Accident: ओडिशातील कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. सरकारने मृत आणि जखमींना मदत जाहीर केली आहे. यातच आता अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी मोठी घोषणा केली आहे. अपघातात आई-वडील गमावलेल्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह घेणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली. ओडिशा दुर्घटनेत आतापर्यंत सुमारे 288 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर 1100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यामध्ये लहान मुले, वृद्धांसह अनेकांचा समावेश आहे. 

तांत्रिक चुकीमुळे कोरोमंडल ट्रेन अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. आता या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जात आहे. पंतप्रधानांपासून ते रेल्वे मंत्रालयापर्यंत आणि इतर राज्य सरकारे या संकटकाळात मृत आणि पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहेत. पंतप्रधान मोदींनीही घटनेचा आढावा घेतल्यानंतर दोषींना सोडले जाणार नाही, असे सांगितले आहे.

काय म्हणाले  गौतम अदानी ?
उद्योगपती उद्योगपती गौतम अदानी यांनी रविवारी ट्विट केले की, ''ओडिशातील रेल्वे अपघातामुळे मला खूप दुःख झाले आहे. लोकांचा त्रास काही प्रमाणात कमी करण्यासाठी अदानी समूहाने अपघातात त्यांचे पालक गमावलेल्या मुलांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला आहे. पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देणे आणि मुलांचे भविष्य चांगले करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.''

रेल्वेकडून 10लाख मदत
मृतांच्या वारसांना रेल्वे मंत्रालयाकडून 10 लाखांची, गंभीर जखमींना 2 लाख तर किरकोळ जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर झाली. त्याशिवाय पंतप्रधान साहाय्यता निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आपापल्या राज्यातील पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

Web Title: Gautam Adani's big announcement; Coromandal express train accident; adani will bear the education expenses of the children of those killed in the train accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.