गौतम गंभीर उचलणार शहीद पोलीस अधिका-याच्या पाच वर्षीय कन्येच्या शिक्षणाचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:43 AM2017-09-06T01:43:52+5:302017-09-06T01:44:58+5:30
अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले जम्मू-काश्मीरचे पोलीस अधिकारी अब्दुल राशीद यांची पाच वर्षीय कन्या जोहरा हिच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च करण्याची जबाबदारी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने घेतली आहे.
श्रीनगर : अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेले जम्मू-काश्मीरचे पोलीस अधिकारी अब्दुल राशीद यांची पाच वर्षीय कन्या जोहरा हिच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च करण्याची जबाबदारी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने घेतली आहे. त्याने हा निर्णय जोहराच्या कुटुंबीयांना कळविला असून त्याबाबत टिष्ट्वट जारी केल्यानंतर जोहराने त्याचे आभार मानले आहे.
मला डॉक्टर व्हायचे असून, माझे स्वप्न प्रत्यक्षात उतरविणे त्यामुळे शक्य होईल, मी मदतीसाठी गौतम सरांचे आभार मानते, असे ती म्हणाली.
गेल्या महिन्यात राशीद यांच्या मृत्यूनंतर तिने दहशतवादाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता. जोहराच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलत असल्याचे गौतम गंभीर याने कळविल्यानंतर माझे कुटुंबीय आनंदी आहे. मला अभ्यास करून डॉक्टर बनायचे आहे, असे तिने नमूद केले. जोहरा ही भारताची कन्या असून, मी तिच्या शिक्षणासाठी पूर्ण पाठिंबा देत आहे. मी तिचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मदत करणार आहे. असे ट्विट गौतमने केले होते.