दहशतवाद्यांबद्दल दया वाटणाऱ्या शाहिद आफ्रिदीची गौतम गंभीरनं अक्कल काढली!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 12:35 PM2018-04-04T12:35:23+5:302018-04-04T12:35:23+5:30

भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरनं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. 

Gautam Gambhir slam shahid afridi on kashmir tweet | दहशतवाद्यांबद्दल दया वाटणाऱ्या शाहिद आफ्रिदीची गौतम गंभीरनं अक्कल काढली!

दहशतवाद्यांबद्दल दया वाटणाऱ्या शाहिद आफ्रिदीची गौतम गंभीरनं अक्कल काढली!

Next

नवी दिल्ली -  भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरनं पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत खात्मा करण्यात आलेल्या 13 दहशतवाद्यांबाबत शाहिदनं सहानुभूती व्यक्त केल्याबाबत गंभीरनं त्याची चांगलीच अक्कल काढली आहे. 

'काश्मीरची परिस्थिती ही अस्वस्थ, चिंता करणारी आहे',असे ट्विट आफ्रिदीनं केले होते.  यावर गौतम गंभीर म्हणाला की, शाहिद आफ्रिदीच्या ट्विटसंदर्भात मीडियानं माझी प्रतिक्रिया मागितली. यावर काय बोलणार. शाहिद आफ्रिदीने 'यूएन'वर नजरा लावल्या आहेत. मात्र त्याच्या डिक्शनरीत 'यूएन'चा अर्थ अंडर 19 असा आहे आणि हे त्याचे वयही आहे. मीडियाने त्याच्या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. नो बॉलवर विकेट घेण्याचा आनंद घेण्याची पाकिस्तानी खेळाडूंची सवयच आहे.''



 



 

शाहिद आफ्रिदीनं नेमके काय केले ट्विट?
जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसांपूर्वी भारतीय लष्कराने कंठस्नान घातलेल्या अतिरेक्यांचा पुळका पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला आला. लष्कराकडून करण्यात आलेल्या या कारवाईविरोधात त्याने गरळ ओकली. शाहिद आफ्रिदीने याबाबत ट्विट करत काश्मीरमधील परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत संयुक्त राष्ट्रसह आतंरराष्ट्रीय संघटनेच्याबाततीत सुद्धा प्रश्न उपस्थित केले आहेत.    
'भारत व्याप्त काश्मीर (जम्मू काश्मीर) येथील परिस्थिती चिंताजनक आहे. याठिकाणी स्वातंत्र्य आणि स्वत:च्या निर्णयावर बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यांचा आवाज दडपशाहीने दाबला जात आहे. याबाबत संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना का पुढाकार घेत नाहीत? हा रक्तपात थांबविण्यासाठी त्या का प्रयत्न करत नाहीत?'' असे शाहिदीनं ट्विटमध्ये म्हटले. 
शाहिद आफ्रिदीने हा पहिल्यांदाच काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला नाही. याआधी म्हणजेच गेल्यावर्षी त्याने याबाबतीत ट्विट केले होते. त्यावेळी त्याने म्हटले होते, काश्मीरमध्ये गेल्या काही दशकांपासून क्रूरतेचे शिकार होत आहेत. आता वेळ आली आहे की या समस्येचे निराकरण केले पाहिजे, ज्यामुळे अनेक लोक मारले गेले. तसचे, दुस-या ट्विटमध्ये काश्मीर धरतीवरील स्वर्ग आहे आणि आम्ही निरपराधांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. 

13 दहशतवाद्यांचा खात्मा
दरम्यान, सोमवारी दक्षिण काश्मिरात तीन ठिकाणी दहशतवाद्यांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत 13 दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले. या चकमकीत तीन जवान शहीद झाले असून, चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी सांगितले की, काश्मीर खोऱ्यात सक्रिय दहशतवाद्यांविरुद्ध हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा प्रतिहल्ला आहे. सुरक्षा दलाने केलेल्या या हल्ल्याने हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबा यांना मोठा झटका बसला आहे.

Web Title: Gautam Gambhir slam shahid afridi on kashmir tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.