मला ब्लॉक कराल; 130 कोटी जनतेचे काय करणार? गौतम गंभीरचं मेहबुबा मुफ्तींना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 06:49 PM2019-04-11T18:49:55+5:302019-04-11T18:49:58+5:30
क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारून राजकारणाच्या मैदानात सक्रीय झालेला गौतम गंभीर सध्या त्याचा आक्रमक वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.
नवी दिल्ली - क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारून राजकारणाच्या मैदानात सक्रीय झालेला गौतम गंभीर सध्या त्याचा आक्रमक वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, गौतम गंभीर आणि जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यात सध्या काश्मीर प्रश्नावरून खडाखडी सुरू आहे. बुधवारी ट्विटरवर रंगलेल्या जुगलबंदीनंतर मेहबुबा मुफ्ती यांनी गौतम गंभीरला ब्लॉक केले होते. आता गंभीरने त्याला प्रत्युत्त दिले असून, मला ब्लॉक कराल, पण देशातील 130 कोटी जनतेला कधीपर्यंत ब्लॉक कराल? अशी विचारणा गंभीरने केली आहे.
ट्विरवर रंगलेल्या वादानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी गौतम गंभीरला ब्लॉक केले होते. दरम्यान, या प्रकारावरून गौतम गंभीरने मेहबूबा यांना प्रत्युत्तर दिले आहे. गंभीर म्हणाला, मेहबूबा मुफ्ती मला ब्लॉक करू शकतात. पण 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील जनतेला कधीपर्यंत ब्लॉक करून ठेवतील, कधीपर्यंत सीमेपलीकडच्या बाबींची चर्चा करणार. या देशात एक लाट आहे आणि मेहबूबा प्रवाहासोबत राहिल्या नाहीत. तर बुडून जातील.'' असा इशारा गंभीरने दिला.
#WATCH Gautam Gambhir says, "she(Mehbooba Mufti) can block me, but till when will she keep blocking 130 cr people of the nation? There is a wave in this country & if she doesn’t flow with it, she'll drown. In 2014 there was a wave, in 2019 there is tsunami & there is development" pic.twitter.com/HR3jZHeyUT
— ANI (@ANI) April 11, 2019
यावेळी गंभीरने पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले. ''2014 मध्ये लाट होती आता 2019 मध्ये त्सुनामी येणार आहे. असा दावा त्याने केला.
गौतम गंभीरने पुन्हा एकदा ट्विटरवरून जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तीवर जोरदार टीका केली होती. मेहबूबा मुफ्ती या जम्मू-काश्मीरला लागलेला 'डाग' असल्याची बोचरी टीका गंभीरने केली. यानंतर गंभीर आणि पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्यात सोशल मीडियावर चांगलीच जुंपली. अखेरीस मेहबूबा मुफ्ती यांनी गंभीरला ट्विटरवर ब्लॉक केले होते.
भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात 370 कलम रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावर मुफ्ती यांनी टीका केली. त्या म्हणाल्या,''जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय संविधान लागू होणार नाही आणि भारतीयांना हे समजत नसेल तर देशच नष्ट होईल.'' त्याला प्रत्युत्तर देताना हा भारत आहे आणि तुमच्या सारखा डाग नाही, जो सहज गायब होईल, असा टोला गंभीरने लगावला होता.