कमल हसनपासून गौतमीची फारकत

By admin | Published: November 2, 2016 04:22 AM2016-11-02T04:22:15+5:302016-11-02T04:22:15+5:30

१३ वर्षे औपचारिक लग्न न करता सोबत राहिल्यानंतर अभिनेत्री गौतमी तडीमल्ला हिने अभिनेता व चित्रपट निर्माता कमल हसन याच्यापासून जड अंत:करणाने फारकत घेतली

Gautami's faintness from Kamal Hasan | कमल हसनपासून गौतमीची फारकत

कमल हसनपासून गौतमीची फारकत

Next


चेन्नई : गेली १३ वर्षे औपचारिक लग्न न करता सोबत राहिल्यानंतर अभिनेत्री गौतमी तडीमल्ला हिने अभिनेता व चित्रपट निर्माता कमल हसन याच्यापासून जड अंत:करणाने फारकत घेतली आहे.
आपल्या ब्लॉगवर स्वत: हे जाहीर करताना गौतमीने लिहिले, ‘ मी आणि श्री. हसन आता एकत्र राहात नसल्याचे सांगताना माझे मन विदीर्ण होत आहे. सुमारे १३ वर्षांच्या साहचर्यानंतर आयुष्यातील सर्वात उद्््ध्वस्त करणारा हा निर्णय मला घ्यावा लागत आहे.
आता आमचे दोघांचे मार्ग पुन्हा मागे न वळता येण्यासारखे वेगळे झाल्याने मनावर दगड ठेवून आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला व हे सत्य पचवायला आपल्याला बराच वेळ लागला, असेही गौतमीने लिहिले.
स्वत:च्या स्वप्नांना मुरड घालणे हा माझ्यापुढे दुसरा पर्याय होता. परंतु ते शक्य नसल्याने सुमारे दोन वर्षांच्या मानसिक द्वंव्दानंतर एक स्त्री म्हणून आयुष्याच्या या टप्प्याला सर्वात कठीण असा हा निर्णय घेणे मला भाग पडले. तरीही मला कोणाहीकडून सहानुभूतीची अपेक्षा नाही वा मला कोणालाही दोषही द्यायचा नाही, असे तिने नमूद केले.
कमल हसन यांची मी यापुढेही ‘फॅन’ राहीन व त्यांच्या कामगिरीचे कौतुक करीत राहीन, असेही तिने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
>मुलीशी उडाला होता खटका
कमल हसन यांची मुलगी श्रुती हिच्याशी खटका उडाल्याच्या बातमीनंतर तीन महिन्यांनी गौतमीने ही फारकत घेतली आहे. श्रुती आणि कमल हसन या दोघांच्याही एकत्र भूमिका असलेला ‘शाबास नायडू’ हा पहिला चित्रपट येऊ घातला आहे. त्या चित्रपटातील आपल्या पात्रासाठी गौतमीने केलेल्या पोषाखाच्या निवडीवरून दोघींमध्ये खटका उडाला होता. त्यानंतर श्रुतीने स्वत:च्या पसंतीचे कपडे आणून चित्रीकरण केले होते.

Web Title: Gautami's faintness from Kamal Hasan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.