कौतुकास्पद! 2 हजारांचं कर्ज घेऊन सुरू केला बांबू प्रोडक्ट्सचा व्यवसाय; आता लाखोंची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 12:04 PM2023-03-17T12:04:50+5:302023-03-17T12:10:44+5:30
बांबूपासून बनवलेल्या कप-प्लेट, ट्रे, फ्लॉवर पॉट, चमचे, काटे, प्लेट, स्ट्रॉ, सोफा, खुर्च्या, बांबूसारख्या सजावटीच्या वस्तूंची मागणी सातत्याने वाढत आहे.
सरकारने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली तेव्हापासून बांबू उद्योगात मोठी भर पडली आहे. या संधीचा फायदा घेत सविता गुप्ता य़ांनी आपला व्यवसाय सुरू केला. बांबूची बाटली, बांबूपासून बनवलेल्या कप-प्लेट, ट्रे, फ्लॉवर पॉट, चमचे, काटे, प्लेट, स्ट्रॉ, सोफा, खुर्च्या, बांबूसारख्या सजावटीच्या वस्तूंची मागणी सातत्याने वाढत असल्याचे सविता यांनी सांगितले. आजच्या अनहेल्दी लाईफस्टाईलमध्ये लोकांमध्ये नैसर्गिक उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बांबूपासून बनवलेल्या वस्तू सगळ्यांनाच आवडतात.
मिळालेल्या माहितीनुसार, गयामध्ये एक महिला आहे जी बांबूपासून वस्तू बनवून हजारो कमावते आहे. इमामगंज ब्लॉक भागातील पकरी गुरिया गावातील रहिवासी असलेल्या सविता गुप्ता यांनी ही कमाल केली आहे. सविता यांनी 2007 मध्ये आरसेटीमधून बांबू आर्ट अँड क्राफ्टचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर हा व्यवसाय वाढवला आणि आज सविता मागणीनुसार महिन्याला लाख रुपयांपर्यंत कमावतात. त्या बांबूपासून बोट, पुष्पगुच्छ, ट्रे, फ्लॉवर पॉट, सजावटीची उत्पादने, पेन स्टँड, फळांची टोपली अशा 30 उत्पादनांची निर्मिती करतात.
बिहारसह इतर राज्यात स्टॉल लावून त्याची विक्री करतात. त्यांच्याकडे बांबूची उत्पादने 50 ते 1000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. बांबूपासून उत्पादन बनवण्यासाठी सविता आसाममधून मकला बांबू घेतात. ज्याची किंमत सुमारे 300 रुपये प्रति बांबू येते. याशिवाय ते स्थानिक बांबूपासून अनेक उत्पादने बनवतात. सविता यांनी सांगितले की, 2007 मध्ये चार महिने प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर 2 हजार रुपयांचे कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू केला. आज चांगले उत्पन्न मिळत आहे. मागणीनुसार महिन्याला लाखापर्यंत कमाई होते.
30 प्रकारची उत्पादने केली जातात तयार
बांबूपासून सुमारे 30 प्रकारची उत्पादने बनवतात. राज्यात आणि राज्याबाहेर होणाऱ्या जत्रांमध्ये स्टॉल लावून त्याची विक्री केली जाते. जेव्हा मागणी जास्त असते तेव्हा घरातील संपूर्ण कुटुंब या कामात गुंतते. जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गयाच्या बांकेबाजार बेला गावाला भेट दिली तेव्हा नितीश कुमार यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले आणि प्रोत्साहन दिले. आज सविता अनेक महिलांना प्रशिक्षणही देतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"