‘जीसीए’त सहा कोटींचा घोटाळा!

By Admin | Published: June 21, 2016 03:53 AM2016-06-21T03:53:48+5:302016-06-21T03:53:48+5:30

गोवा क्रिकेट संघटनेत (जीसीए) आणखी ५.८७ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सोमवारी झाला.

GCA scam: Six crores scam! | ‘जीसीए’त सहा कोटींचा घोटाळा!

‘जीसीए’त सहा कोटींचा घोटाळा!

googlenewsNext

पणजी : गोवा क्रिकेट संघटनेत (जीसीए) आणखी ५.८७ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप
सोमवारी झाला. बनावट सह्या करून बीसीसीआयच्या निधीवर डल्ला मारल्याच्या आरोपावरूनजीसीएचे अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद ऊर्फ बाळूफडके आणि खजिनदार अकबर मुल्ला या त्रिकुटाच्या अटकेनंतर गोव्याचे क्रिकेट हादरले असताना ‘जीसीए’ला हा आणखी
झटका बसला.
२००७-०८ आणि २००८-०९ या कालावधीतील हा घोटाळा आहे. माजी रणजीपटू नीलेश प्रभुदेसाई यांनी यासंदर्भात आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल केली असून चौकशीची मागणी केली. नीलेश प्रभुदेसाई म्हणाले, जीसीएच्या आर्थिक अहवालानुसार बीसीसीआयकडून मिळालेल्या पाच कोटी ८७ लाख २२ हजार ५५ रुपयांच्या रकमेची आवक ताळेबंदामध्ये नोंद नाही. ही रक्कमही कार्यकारी समितीने हडप केली.
या घोटाळ््यातही चेतन देसाई, विनोद फडके आणि अकबर मुल्ला यांचा हात आहे. पाच कोटींहून अधिक रकमेचा धनादेश जीसीएच्या
नावे दाखवत असला तरी
त्याची नोंद ताळेबंदामध्ये नाही. यासंदर्भात सीबीआय आणि दक्षता खात्यानेही चौकशी केली आहे.
त्याचा अहवालही दिला आहे. त्यावरून घोटाळेबाजांवर कारवाई करावी. एवढी मोठी रक्कम ही बनावट सह्या करूनच लंपास केल्याचा आरोप प्रभुदेसाई यांनी केला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: GCA scam: Six crores scam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.