दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक गिलानींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
By admin | Published: February 16, 2016 05:45 PM2016-02-16T17:45:40+5:302016-02-16T17:57:46+5:30
दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक एसएआर गिलानी यांना पतियाळा कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Next
>
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक एसएआर गिलानी यांना पतियाळा कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना एका पत्रकार परिषदेत देशाविरोधात घोषणा दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
आज पतियाळा कोर्टात गिलानींना हजर केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या चौकशीसाठी दोन दिवस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यावर कोर्टाने एसएआर गिलानींना दोन दिवसांच्या पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत.
गिलानींना पोलिसांनी देशद्रोह आणि अन्य आरोपांखाली मंगळवारी पहाटे अटक केली होती. गिलानी यांच्यावर एका पत्रकार परिषदेत देशाविरोधात घोषणा दिल्याप्रकरणी कलम १२४ अ देशद्रोह, १२० ब गुन्हेगारी कट रचण आणि कलम १४९ या कलमांखाली पार्लमेंट स्ट्रीट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.