आरोग्य, लाईट विभाग धारेवर महासभा: तक्रारींची दखलही घेतली जात नाही

By admin | Published: February 21, 2016 12:31 AM2016-02-21T00:31:52+5:302016-02-21T00:31:52+5:30

जळगाव : शहरातील साफसफाईच्या कामात फारशी प्रगती नसल्याबद्दल सदस्यांनी सभेत नाराजी व्यक्त केली. शौचालये साफसफाईचा ठेका असलेल्या ठेकेदाराकडूनही कामे होत नसल्याबद्दल भाजपा गटनेता डॉ. अश्विन सोनवणे यांनी नाराजी व्यक्त केली.

The General Assembly on Health, Light Section Dhara: Complaints are not taken into account | आरोग्य, लाईट विभाग धारेवर महासभा: तक्रारींची दखलही घेतली जात नाही

आरोग्य, लाईट विभाग धारेवर महासभा: तक्रारींची दखलही घेतली जात नाही

Next
गाव : शहरातील साफसफाईच्या कामात फारशी प्रगती नसल्याबद्दल सदस्यांनी सभेत नाराजी व्यक्त केली. शौचालये साफसफाईचा ठेका असलेल्या ठेकेदाराकडूनही कामे होत नसल्याबद्दल भाजपा गटनेता डॉ. अश्विन सोनवणे यांनी नाराजी व्यक्त केली.
महासभेत विषय पत्रिकेवरील १२ विषयांवर चर्चा होऊन मान्यता देण्यात आल्या नंतर शहरातील विविध समस्यांच्या विषयांवर चर्चा सुरू झाली. भाजपा गटनेते सोनवणे यांनी कामे फारशी समाधानकारक नसल्याचे सांगितले. कामे सांगितल्यावर कामगार पेमेंट नसल्याचे कारण सांगतात. यावर उपाय काय? असा सवाल त्यांनी अधिकार्‍यांना केला. नवीन वाहने मिळणार सांगितले जाते पण त्यातही प्रगती नाही. यात वेळकाढू धोरण होत आहे. एक विभाग आपली जबाबदारी दुसर्‍यावर ढकलतो. प्रशासकीय कामांमुळे वेळ जातो असे नितीन ल‹ा यावेळी म्हणाले. समन्वयाचा अभाव अधिकारी वर्गात असल्याचे ते म्हणाले.

ठेका रद्द नाही
सफाई कामाचे ठेके रद्द झाले मात्र वेलफेअर फाउंडेशनकडून शौचालयांची सफाई होत नसल्याच्या तक्रारी असताना कारवाई होत नसल्याची खंत सदस्यांनी व्यक्त करून. आरोग्याधिकारी उदय पाटील यांनी याप्रश्नी स्पष्टीकरण द्यावे अशा सूचना केल्या.

अहवाल प्राप्त
शौचालये सफाईचा ठेका असलेल्या संस्थेस १० वर्षांचा मक्ता देण्यात आला आहे. करारानुसार महापालिका त्यांना पाणी देणार होती मात्र सहा ठिकाणी पाण्याची गाडी जाऊ शकत नाही. १२ ठिकाणचे बोअरिंग बंद आहे. त्यांना कबुल केलेल्या शर्तीप्रमाणे आपण देऊ शकत नसल्याचे सांगून याप्रश्नी प्रशासनास अहवाल सादर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनामत परत करतानाच्या प्रशासनाच्या भूमिकेवर नितीन ल‹ा यांनी नाराजी व्यक्त करून ठेकेदारांना त्यांचे अनामतीचे पैसे देताना आखडता हात का? असा सवाल त्यांनी केला.

Web Title: The General Assembly on Health, Light Section Dhara: Complaints are not taken into account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.