जनरल मोटर्स भारतात कार बनवणार, पण विकणार नाही !

By admin | Published: May 18, 2017 03:22 PM2017-05-18T15:22:13+5:302017-05-18T15:22:13+5:30

कार उत्पादनात आघाडीची कंपनी असलेल्या जनरल मोटर्सनं भारतात गाड्यांची विक्री करणं थांबवलं आहे.

General Motors will make a car in India, but will not sell! | जनरल मोटर्स भारतात कार बनवणार, पण विकणार नाही !

जनरल मोटर्स भारतात कार बनवणार, पण विकणार नाही !

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - कार उत्पादनात आघाडीची कंपनी असलेल्या जनरल मोटर्सनं भारतात गाड्यांची विक्री करणं थांबवलं आहे. मात्र तरीही जनरल मोटर्स स्वतःच्या प्लांटमध्ये नव्या गाड्यांच्या मॉडलची निर्मिती आणि निर्यात करणार आहेत. कंपनीतील तालेगावमधील असेन्बली प्लांट एक्सपोर्ट हबच्या स्वरूपात काम करणार आहे. त्यामुळे कंपनी आता पूर्णतः गाड्या निर्यात करण्यावर भर देणार आहे. जनरल मोटर्स भारतात शेवरले या ब्रँडअंतर्गत गाड्या बनवतात.

जनरल मोटर्स इंटरनॅशनल एक्झिक्युटिव्ह व्हाइस प्रेसिडंट स्टिफन जेकोबी म्हणाले, आम्ही प्रत्येक गोष्टीवर चर्चा केली आहे. घरगुती बाजारात लांब पल्ल्यापर्यंत फायदा मिळवणं कठीण आहे, हे आमच्या लक्षात आलं आहे. आम्ही आमच्या भागधारकांना डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे. भारतात विक्री बंद केल्याची सूचना कंपनीनं कर्मचा-यांनाही दिली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ग्राहक आणि वितरक प्रभावित होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जनरल मोटर्सनं एक योजनाही आखली आहे.

ग्राहक समर्थन केंद्र स्वतःचं काम करत राहणार आहेत. शेवरलेच्या गाड्यांवर दिलेली वॉरंटी कायम राहणार आहे. गाड्यांचे सर्व पार्ट्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र हे सर्व कधीपर्यंत सुरू राहणार आहे, याबाबत कंपनीनं अद्याप कल्पना दिलेली नाही. कंपनीनं 1-800-3000-8080 हा नंबरही जारी केला आहे. तसेच इतर सर्व माहिती gmi.cac@gm.com किंवा chevrolet.co.in वर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. डिसेंबर 2010 ते जुलै 2014मध्ये तयार करण्यात आलेल्या डिझेलवरील बिट या हॅचबॅक श्रेणीतील वाहनांमध्ये सदोष क्लच पॅडल असल्याने त्या दुरुस्त करून देण्याचे आश्वासन अमेरिकी कंपनी जनरल मोटर्सने दिले होते. यानुसार शेवरले नाममुद्रेतील बिटची 1,01,597 वाहने माघारी घेतली होती. डिझेलवरील बिटच्या संबंधित कालावधीत तयार करण्यात आलेल्या वाहनांची तपासणी करून क्लच पॅडलमध्ये दोष आढळल्यास ते विनाशुल्क दुरुस्त करण्याची तसेच बदलून देण्याची तयारी यानिमित्ताने कंपनीने दाखविली होती. कंपनी तिच्या देशभरातील 248 वाहन सेवा केंद्रात यासाठीची आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत आहे. कंपनीने 2013 मध्येही 1.14 लाख वाहने माघारी बोलाविली होती. शेवरलेच्या तवेरा या बहुपयोगी वाहनांमध्ये उत्सर्जनाविषयीच्या तक्रारी होत्या. कंपनीने ही वाहने 2005 ते 2013दरम्यान तयार केली होती.

Web Title: General Motors will make a car in India, but will not sell!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.