जिओला एअरटेलची ‘४जी डाटा’ची टक्कर

By admin | Published: April 18, 2017 01:08 AM2017-04-18T01:08:36+5:302017-04-18T01:08:36+5:30

रिलायन्स जिओने काही मोफत आणि काही अतिशय स्वस्त योजनांसह बाजारात उडी घेतल्यापासून, त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होत गेली असून

Geo Airtel's '4G Data' collision | जिओला एअरटेलची ‘४जी डाटा’ची टक्कर

जिओला एअरटेलची ‘४जी डाटा’ची टक्कर

Next

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने काही मोफत आणि काही अतिशय स्वस्त योजनांसह बाजारात उडी घेतल्यापासून, त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होत गेली असून, जिओला टक्कर देण्यासाठी अन्य टेलिकॉम कंपन्यांनीही तशाच योजना जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.
कोट्यवधींचा टप्पा पार केल्यानंतर, जिओने मोफत सेवा बंद केली आणि प्राइम मेंबरशिपची आॅफर आणली. त्यालाही ग्राहकांनी बऱ्यापैकी प्रतिसाद दिला. मग जिओने ‘समर सरप्राइज’ आॅफर बंद करून ‘धन धना धन’ ही आॅफर ग्राहकांसाठी सेवेत आणली.
त्याचा फटका बसू नये, म्हणून एअरटेलनेही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ३ महिन्यांसाठी ४जी स्पीड आणि ३0 जीबी फ्री डाटा देण्याची घोषणा केली आहे.
एअरटेलचे सीईओ गोपाल विठ्ठल यांनी आपल्या पोस्टपेड ग्राहकांना एक ईमेलच पाठवला आहे. पुढील तीन महिने मोफत डाटाचा लाभ घ्या, ही आॅफर तुमच्या लांब उन्हाळी सुट्ट्यांमध्येही सुरू राहील, असे गोपाल विठ्ठल यांनी ईमेलमध्ये नमूद केले आहे. जे ग्राहक इंटरनॅशनल रोमिंग पॅक सक्रिय करू शकले नाहीत, त्यांना त्यांचे पैसेही परत मिळणार आहेत.
या आधी रिलायन्स जिओच्या दोन्ही आॅफर्स एकसारख्या असल्यामुळे ‘धन धना धन’ ही आॅफर बंद
करावी, अशी मागणी एअरटेलने ट्रायकडे केली होती.
रिलायन्सच्या या आॅफरमुळे टेलिकॉम कंपन्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे एअरटेलच्या प्रवक्त्याने सांगितले होते. टेलिकॉम कंपन्यांची स्थिती अत्यंत वाईट असल्याने, इतर स्पर्धकांना अशी आॅफर देणे शक्य नसल्याचेही ते म्हणाले होते.
रिलायन्सने जिओ प्राइम मेंबरशिपसोबत दिलेली तीन महिन्यांची मोफत सेवा बंद करावी, असा आदेश दिल्यानंतर, रिलायन्सने नव्या रूपात पुन्हा जुनीच आॅफर ग्राहकांसाठी सेवेत आणली होती. या नव्या आॅफरचे नाव ‘जिओ धन धना धन’ आहे.
जिओ ‘समर सरप्राइज’ आॅफरप्रमाणेच सर्व सुविधा या आॅफरमध्ये आहेत. जिओच्या नव्या आॅफरद्वारे तीन महिन्यांसाठी
मोफत डाटा, सोबतच फ्री एसएमएस सेवा, जिओ अ‍ॅप सबस्क्रिप्शन मिळणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Geo Airtel's '4G Data' collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.