PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 06:49 PM2024-09-17T18:49:18+5:302024-09-17T18:50:39+5:30

Georgia Meloni Wishes PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 74वा वाढदिवस आहे.

Georgia Meloni Wishes PM Modi: Special birthday wishes to PM Modi from Italy; What did Georgia Meloni say? | PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...

PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...

Georgia Meloni Wishes On PM Modi Birthday : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज(17 सप्टेंबर) वाढदिवस (PM Modi Birthday) आहे. यानिमित्त देशासह जगभरातून पीएम मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हमजे, इटलीतून पीएम मोदींसाठी खास शुभेच्छा आल्या आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Georgia Meloni) यांनी पीएम मोदींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

सोशल मीडियावर शेअर केलेल्या संदेशात त्यांनी इटली आणि भारत यांच्यातील मजबूत आणि वाढणारे संबंध तसेच जागतिक आव्हानांना एकत्रितपणे तोंड देण्याची परस्पर वचनबद्धता दर्शविली. आपल्या पोस्टमध्ये मेलोनी म्हणतात, "भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा. मला आशा आहे की, आम्ही इटली आणि भारताची मैत्री आणि परस्पर मदत पुढेही काम ठेवू." 

पंतप्रधान मोदींचा 74 वा वाढदिवस 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी (17 सप्टेंबर 2024) 74 वर्षांचे झाले आहेत. नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील मेहसाणा या छोट्याशा गावात झाला. त्यांनी 2001 ते 2014, सलग तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. यानंतर 2014 मध्ये ते भारताचे पंतप्रधान झाले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा ते देशाचे पंतप्रधान बनले.

Web Title: Georgia Meloni Wishes PM Modi: Special birthday wishes to PM Modi from Italy; What did Georgia Meloni say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.