आता जर्मनीची जगप्रसिद्ध कंपनी चीनला शॉक देणार; भारतात मोठा प्रकल्प हलविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 08:25 PM2020-05-17T20:25:44+5:302020-05-17T20:34:13+5:30

मोबाईल साहित्य बनविणारी कंपनी लावा इंटरनॅशनल ने चीनला मोठा झटका दिला आहे. ही भारतीय कंपनी होती, पण आता चीनमधून जर्मनीची मोठी कंपनी बाहेर पडत आहे.

german footwear brand von wellx will shift production unit from china to India hrb | आता जर्मनीची जगप्रसिद्ध कंपनी चीनला शॉक देणार; भारतात मोठा प्रकल्प हलविणार

आता जर्मनीची जगप्रसिद्ध कंपनी चीनला शॉक देणार; भारतात मोठा प्रकल्प हलविणार

Next

नवी दिल्ली : चीनमधून बाहेर जाणाऱ्या कंपन्यांना भारतात आकर्षित करण्यास यश येत आहे. कोरोनामुळे चीनची प्रतिमा मलिन झाली आहे. मुळची भारतीय असलेल्या लावा इंटरनॅशनलनेही भारतात येण्याचा निर्णय घेतला असतानाच आता जर्मनीची मोठी कंपनीही भारतात येणार आहे. 


जर्मनीचा फुटवेअर ब्रँड वॉन वेल्स (Von Wellx) चीनमधील उत्पादन प्रकल्प भारतात स्थलांतरीत करणार आहे. भारतात हा प्रकल्प आग्रामध्ये स्थापन केला जाणार असून लॅट्रिक इंडस्ट्रीसोबत कंपनीने करार केल्याचे समजत आहे. 


वॉन वेल्स (Von Wellx) या फुटवेअर ब्रँडची ओळख एक आरोग्यदायी फुटवेअरच्या रुपात आहे. या कंपनीची उत्पादने पाय, गुढगा आणि पाठीचे दुखने यावर दिलासा देतात, अशी याची ख्याती आहे. हे फटवेअर स्नायूंना शॉक देण्यापासून वाचवितात. जगभरात ही कंपनी प्रसिद्ध असून ८० देशांमध्ये विक्री केली जाते. महत्वाचे म्हणजे या कंपनीची उत्पादने वापरणारे १० कोटी लोक आहेत. 


हा ब्रँड २०१९ मध्ये लाँच करण्यात आला असून जगभरात या कंपनीचे ५०० रीटेल स्टोअर आहेत. याशिवाय चा कंपनीच्या उत्पादनांची ऑनलाईन विक्रीही केली जाते. 


लावा मोबाईल भारतात परतणार....
मोबाईल साहित्य बनविणारी कंपनी लावा इंटरनॅशनल ने चीनला मोठा झटका दिला आहे. कंपनीने शुक्रवारी सांगितले की, चीनमधील प्रकल्प कायमचा बंद करून भारतात येत आहोत. कंपनीच्या संचालकांचे म्हणणे आहे की, आम्ही आता भारतातून चीनला मोबाईल निर्यात करणार आहोत. यासाठी पुढील पाच वर्षांत भारतात ८०० कोटी रुपये गुंतविण्यात येणार आहेत. लावा मोबाईल कंपनीने मोबाईल फोन विकसित आणि निर्माण करण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी योजना बनविली आहे. लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष हरी ओम राय यांनी सांगितले की, उत्पादन डिझाईन करण्याच्या क्षेत्रात आमचे चीनमध्ये जवळपास ६०० ते ६५० कर्मचारी आहेत. आता हे काम आम्ही भारतात हलविले आहे. भारतातील विक्रीच्या गरजा आम्ही स्थानिक प्रकल्पांतून पूर्ण करत आहोत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus चीनच दोषी! अमेरिकेचे आरोप खरे ठरले; कोरोनाचे सॅम्पल नष्ट केल्याचे मान्य

मोठी घडामोड! तैवान ताब्यात घेण्यासाठी चीनचे मोठे पाऊल; अमेरिकेचे युद्धनौकांना तातडीचे आदेश

लॉकडाऊनमध्येही मुली असुरक्षित; नराधम भावाकडून चुलत बहिणीवर बलात्कार

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घेरले; चकमकीत योद्धा शहीद

'आम्ही आहोत'! लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे हेल्पलाईन नंबर; लिहून ठेवा...

न भूतो! रॉयल एनफिल्डच्या बुलेटवर कधी नव्हे तेवढी ढासू ऑफर

नियम बदलला! Fastag असला तरीही टोलनाक्यांवर जबर दंड बसणार; ही चूक टाळाच

Web Title: german footwear brand von wellx will shift production unit from china to India hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.