सौरऊर्जेसाठी जर्मनीचं भारताला २ अब्ज युरोंचं सहाय्य
By admin | Published: October 5, 2015 03:58 PM2015-10-05T15:58:04+5:302015-10-05T15:58:04+5:30
सौरऊर्जेवर आधारीत प्रकल्पासाठी आणि क्लीन एनर्जी कॉरिडॉरसाठी जर्मनी भारताला २ अब्ज युरोंचे (सव्वा दोन अब्ज डॉलर्स) सहाय्य देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - सौरऊर्जेवर आधारीत प्रकल्पासाठी आणि क्लीन एनर्जी कॉरिडॉरसाठी जर्मनी भारताला २ अब्ज युरोंचे (सव्वा दोन अब्ज डॉलर्स) सहाय्य देणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांना सांगितले आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्याशी चर्चा व करार झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
या वर्षाअखेरीस पॅरीसमध्ये वातावरण बदल व स्वच्छ ऊर्जेचा वापर यासंदर्भात आंतरराष्ट्रीय परीषद होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौरऊर्जेसारख्या पर्यायी ऊर्जेच्या निर्मितीसाठी महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट्ये ठेवली आहेत. या क्षेत्रामध्ये जर्मनीच्या नेत्यांनी अभूतपूर्व काम केल्याची प्रशंसा मोदी यांनी केली आहे.