'मला माझी 44 दिवसांची मजुरी मिळवून द्या...'; प्रजासत्ताक दिनाचे गेस्ट गार्डनर यांची PM मोदींकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 03:40 PM2023-01-27T15:40:41+5:302023-01-27T15:43:23+5:30
नंदन हे गेल्या 2 महिन्यांपासून इंडिया गेटवर हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम करतात. यापूर्वी ते एका ठेकेदाराच्या माध्यमाने आंध्र भवनात काम करत होते.
संपूर्ण देशात गुरुवारी प्रजासत्ताक दिन अत्यंत आनंदात साजरा केला. महत्वाचे म्हणजे, यावर्षी सेंट्र्ल विस्टा प्रोजेक्ट आणि कर्तव्य पथाच्या कामाशी संबंधित मजुरांनाही परेड पाहण्यासाठी विशेष पास देण्यात आले होते. या मंडळींना पहिल्याच रांगेत VVIP च्या जागेवर बसवण्यात आले होते. पीएम मोदींनी त्यांना अभिवादनही केले. या मजुरांमध्ये गार्डनर सुख नंदन यांचाही समावेश होता.
सुख नंदन म्हणाले, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला भेटण्यासाठी आले. तेव्हा त्यांना एवढ्या जवळ पाहून ते अत्यंत आनंदी झाले. मात्र यावेळी, जर आपल्याला मोदींसोबत बोलण्याची संधी मिळाली असती, तर आपण त्यांच्याशी काय बोलला असतात? असे विचारले असता, सुख नंदन यांनी सांगितले, की त्यांच्या जुन्या ठेकेदाराने त्यांची 44 दिवसांची मजुरी दिलेली नाही. त्यामुळे पंतप्रधानांकडे ही मजुरी मिळवून देण्यासाठी मद करण्याची मागणी करेन.
नंदन हे गेल्या 2 महिन्यांपासून इंडिया गेटवर हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटमध्ये काम करतात. यापूर्वी ते एका ठेकेदाराच्या माध्यमाने आंध्र भवनात काम करत होते.
सुख नंदन मुळचे मध्य प्रदेशचे -
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सुख नंदन मध्य प्रदेशातील निवाडी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी सांगितले, की पंतप्रधान मोदींना एवढ्या जवळून पाहून अत्यंत आनंद वाटला. पीएम मोदी जवळ आले आणि त्यांनी हात हलवत सर्वांना अभिवादन केले, तेव्हा आपल्याला अत्यंत आनंद वाटला. अशा कार्यक्रमास उपस्थित राहता आले यामुळेही मी अत्यंत आनंदी आहे. आपण प्रजासत्ताक दिवाच्या दिवशी विशेष पाहूने होऊ असे मला कधीही वाटले नव्हते.
जुन्या ठेकेदाराकडे 21 हजार बकी -
नंदन यांनी सांगितले की, ठेकेदाराने त्यांची 44 दिवसांची सॅलरी देण्यास नकार दिला आहे. नंदन यांचा दावा आहे की, त्यांच्याकडे उपस्थिती नोंदवल्या जाणाऱ्या रजिस्टरची कॉपीही आहे. याच्या माध्यमाने ते 44 दिवस उपस्थित असल्याचेही सिद्ध करू शकतात. सध्या नंदन आपली पत्नी आणि मुलांसोबत इंडिया गेट जवळ तयार करण्यात आलेल्या एका तात्पूरत्या टेंटमध्ये राहतात.
याच बरोबर, ठेकेदार आपली सॅलरी देण्यास तयार नसल्याने मी त्यांचे ब्रश कटर देण्यास नकार दिला आहे. तसेच त्यांनी माझी सॅलरी द्यावी आणि सामान घेऊन जावे, असेही आपण ठेकेदारास सांगितले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नंदन यांच्या मते, स्थानिक संस्थांनी गार्डनरची सॅलरी 14,586 रुपये एवढी निश्चित केली आहे. यामुळे माझी 44 दिवसांची सॅलरी जवळपास 21000 रुपये होते. मात्र ठेकेदार केवळ 6,000 रुपयेच देण्याचे बोलत आहे. तसेच ठेकेदार त्याच्या सामानासाठी एफआयआरचीही धमकी देत आहे. अशा स्थितीत मला सरकारकडून मदत मिळाल्यास मी सरकारचा आभारी असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.