सिंचन क्षेत्राला अधिक निधी मिळावा - गडकरी

By admin | Published: June 15, 2016 05:12 AM2016-06-15T05:12:22+5:302016-06-15T05:12:22+5:30

शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणेकरिता सिंचन क्षेत्रासाठी जास्तीतजास्त निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. नवनिर्मित तेलंगणाने हे महत्त्व लक्षात घेऊन सिंचनासाठी २५ हजार कोटी रुपये मंजूर केले.

Get more funds for irrigation sector: Gadkari | सिंचन क्षेत्राला अधिक निधी मिळावा - गडकरी

सिंचन क्षेत्राला अधिक निधी मिळावा - गडकरी

Next

- प्रमोद गवळी,  नवी दिल्ली

शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणेकरिता सिंचन क्षेत्रासाठी जास्तीतजास्त निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. नवनिर्मित तेलंगणाने हे महत्त्व लक्षात घेऊन सिंचनासाठी २५ हजार कोटी रुपये मंजूर केले. मध्य प्रदेशातसुद्धा सातत्याने यासाठी मोठी रक्कम दिली जात आहे. परंतु महाराष्ट्राने मात्र यावर्षी फक्त ७ हजार कोटींची तरतूद केली, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केले.
दि कौन्सिल फॉर सोशल डेव्हलपमेंट, खासदार राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सेंटर फॉर अ‍ॅग्रिकल्चरल पॉलिसी डायलॉगच्या संयुक्त विद्यमाने ‘शेतकऱ्यांची कर्जाच्या विळख्यातून मुक्तता: भारतात धोरणात्मक सुधारणांचे आव्हान’ या विषयावर एका राष्ट्रीय परिसंवादाचे बोलताना गडकरी म्हणाले, महाराष्ट्रात केवळ १८.६ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नवाढीसाठी नवनवीन पद्धती, अन्नधान्य प्रक्रिया, मधमाशा पालन, बांबू उद्योग यांचाही विचार करणे गरजेचे आहे.

Web Title: Get more funds for irrigation sector: Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.